mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

मेहकर एसडीओमधील लाचखोर प्रस्तुतकारास ठोकल्या बेड्या : Bribery presenter arrested in Mehkar SDO

शेअर करा :

Bribery presenter arrested in Mehkar SDO : वीस हजारांची लाच घेणाऱ्या येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील प्रस्तुतकार तथा सहाय्यक महसूल अधिकारी कैलास मुरकुट यास वाशीम येथील लाचलुचपत वीस हजारांची लाच घेणाऱ्या येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील प्रस्तुतकार तथा सहाय्यक महसूल अधिकारी कैलास मुरकुट यास वाशीम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.


 

Bribery presenter arrested in Mehkar SDO
आरोपी कैलास मुरकुट

आदेशाची प्रत देण्यासाठी घेतले वीस हजार : वाशीम एसीबीची कारवाई


आसिफ शाह


मेहकर : शेतकऱ्याची फेरफार रद्द करण्यासंबंधीच्या अंतिम आदेशाची प्रत देण्यासाठी वीस हजारांची लाच घेणाऱ्या येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील प्रस्तुतकार तथा सहाय्यक महसूल अधिकारी कैलास मुरकुट यास वाशीम येथील लाचलुचपत वीस हजारांची लाच घेणाऱ्या येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील प्रस्तुतकार तथा सहाय्यक महसूल अधिकारी कैलास मुरकुट यास वाशीम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.१६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी चार वाजेच्या,प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली.

वकिलाने त्यांच्या नातेवाइकांना न्याय देण्यासाठी या संदर्भात तक्रार केली होती. (महादेशा न्यूज) त्यानुसार सापळा रचण्यात आला. मेहकर उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयात प्रस्तुतकार – १ या पदावर कार्यरत कैलास मुरकुट

तक्रारदार हे पेशाने वकील आहेत. त्यांचे पक्षकार व नात्याने चुलत आजोबांच्या जमिनीचे फेरफार रद्द करण्यासाठी कायदेशीर बाबी पाहण्यासाठीचे वकीलपत्र त्यांनी घेतले. फेरफारवरील केलेल्या अपीलावर २३ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम आदेश झाला होता. (महादेशा न्यूज) सदर अंतिम आदेशाची मूळ नक्कल कैलास मुरकुट याच्याकडे होती. त्या आदेशची प्रत मागितले असता मुरकुट याने २० हजारांची लाच मागितली.  (महादेशा न्यूज) या

दरम्यान, कामानिमित्त येणाऱ्या जनतेची अशा पद्धतीने लूट करणाऱ्या सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला अद्दल घडविण्यासाठी वकिलांनी वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. १६ एप्रिल रोजी लाच मागणी पडताळणी केली असता कैलास भगवान मुरकुट याने लाच स्वीकारण्यास संमती दिली. (महादेशा न्यूज) यानंतर १६ एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास वाशिम एसीबी च्या पथकाने मेहकर उपविभागीय अधिकारी कार्यालयात सापळा रचला. मुरकुट याने रक्कम घेताच पकडण्यात आले. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी, पोलीस उपअधीक्षक जगदीश परदेशी, पोहेकॉ नितीन टवलारकर, योगेश खोटे, चालक मंगेश देवकाते यांनी या कारवाईस सहभाग घेतला.

यापूर्वी वाशीम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने फेब्रुवारी महिन्यात मेहकर येथील जिल्हा सत्र न्यायालयातील सहाय्यक सरकारी वकिलास लाच घेताना पकडले होते. आता वाशिमच्या पथकाने वकिलाच्या तक्रारीवरून सहाय्यक महसूल अधिकाऱ्यास अटक केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top