mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

गणवेश-पुस्तकांसाठी शाळांची सक्ती बंद! : Schools stop compulsory for uniforms and books

शेअर करा :

Schools stop compulsory for uniforms and books : विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, पुस्तके किंवा इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या शाळांवर आता कारवाई होणार आहे.


Schools stop compulsory for uniforms and books

मेहकर : विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, पुस्तके किंवा इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या शाळांवर आता कारवाई होणार आहे.राज्यातील सर्व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना अशा सक्तीपासून दूर राहण्याचे स्पष्ट निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. शासनाच्या विद्यमान निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण विभागाने नव्याने परिपत्रक जारी करत सर्व शिक्षणाधिकारी व प्रशासन अधिकाऱ्यांना दक्ष राहण्याचे आदेश दिले आहेत. पालकांकडून तक्रार प्राप्त झाल्यास तत्काळ चौकशी करून संबंधित शाळेवर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय, कोणत्याही शाळेने विद्यार्थ्यांवर विशिष्ट खाजगी प्रकाशनांची पुस्तके खरेदी करण्याचे बंधन घालू नये, असेही आदेशात नमूद आहे. राज्य मंडळ, CBSE आणि ICSE शाळांनी मान्यताप्राप्त पाठ्यपुस्तकेच वापरावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे पालकांना शैक्षणिक साहित्य खरेदीत मोकळीक मिळणार असून शाळांकडून होणाऱ्या आर्थिक सक्तीला आळा बसणार आहे.

उपरोक्त विषयाचे अनुषंगाने संदर्भ क्र.२ चे शासनाचे निर्देशानुसार, संचालनालयाने शासन निर्णय ११ जून, २००४ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती न करण्याबाबत संदर्भ क्र.३ चे परिपत्रक निर्गमित केले आहे. सदर परिपत्रकानुसार याअनुषंगाने शासन निर्णय ११ जून, २००४ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत पुनश्च निर्देश देण्यात येत आहे.

 

सदरील विषयाचे गांभीर्य पाहता सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांकडून गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती करण्यात येऊ नये. याबाबतच्या सूचना सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना द्याव्यात. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांनी त्याबाबत शहानिशा करून तथ्य आढळल्यास संबंधित शाळेवर कारवाई करावी.

 

राज्य मंडळ, C.B.S.E.. I.C.S.E. मंडळाच्या शाळांनी NCERT / SCERT (बालभारतीची) पाठ्यपुस्तके वापरावीत. अन्य मंडळांच्या शाळांनी त्या त्या मंडळांनी प्रमाणित केलेली पाठ्यपुस्तके वापरावीत. कोणत्याही शाळेने विशिष्ट खाजगी प्रकाशनांच्या पुस्तकांचा वापर करण्याचे बंधन विद्यार्थ्यांवर लादू नये.

 

याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकाऱ्यांनी त्याबाबत शहानिशा करून तथ्य आढळल्यास संबंधित शाळेवर कारवाई करावी, असे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top