mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

संसारवेल बहरण्याआधीच तुटली! : The world broke before it blossomed

शेअर करा :

The world broke before it blossomed : प्रेमाची नाळ जुळली आणि सुखी, संसाराची स्वप्ने दोघे रंगवू लागले. मात्र, संसारवेल बहरण्याआधीच तुटली. प्री वेडिंग केल्यानंतर आजारी पडलेल्या उपवर वधूचा आठ दिवसांनी मृत्यू झाला.


The world broke before it blossomed
संग्रहित फोटो

प्री-वेडिंगनंतर आजारी पडलेल्या उपवर वधूचा मृत्यू : ३ मे रोजी लागणार होते लग्न

बुलढाणा : प्रेमाची नाळ जुळली आणि सुखी, संसाराची स्वप्ने दोघे रंगवू लागले. मात्र, संसारवेल बहरण्याआधीच तुटली. प्री वेडिंग केल्यानंतर आजारी पडलेल्या उपवर वधूचा आठ दिवसांनी मृत्यू झाला. ३ मे रोजी होणारा लग्न सोहळा एक अधुरा ठरला. वाशीम जिल्ह्यातील एका गावात ही दुर्दैवी घटना घडली.

मेहकर तालुक्यातील डोणगावपासून जवळच असलेल्या एका गावातील तरुण आणि वाशीम जिल्ह्यातील एका गावामधील तरुणीचे लग्न जुळले. ३ मेच्या मुहूर्तावर लग्न ठरले. लग्नासाठी सोन्या-चांदीचे दागिने, कपडे खरेदीला जाण्यासाठी उपवर मुलाने नवीन फोरव्हीलर गाडी खरेदी केली. मोठ्या थाटामाटात लग्नाची खरेदी केल्या गेली. तर दुसरीकडे विवाह सोहळा अविस्मरणीय व्हावा, यासाठी प्री-वेडिंग शूट करण्याचे ठरले. नवऱ्या मुलाचा कृषी केंद्राचा व्यवसाय असल्याने प्री-वेडिंगसुद्धा कृषीशी निगडितच असावे, याचे नियोजन करण्यात आले. भावी वधू-वराने शेतकरी म्हणून प्री वेडिंग शूट करायचे ठरवले. डोणगावपासूनच जवळच असलेल्या एका निसर्गरम्य व जंगल परिसरात १६ एप्रिलला प्री वेडिंग शूट आनंदात झाले. त्याच दिवशी घरी परतल्यानंतर उपवर मुलगी आजारी पडली. सुरुवातीला गावातच उपचार करण्यात आले. नंतर शिरपूर, वाशीम, अकोला येथे औषधोपचार करूनही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने अखेर छत्रपती संभाजीनगर येथे  हलविण्यात आले. २३ एप्रिल रोजी उपचारादरम्यान नवऱ्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि प्रेमाच्या तुटलेल्या हिंदोळ्याने दोघांचाही संसार अधुरा राहिला.

 

सध्या सूर्य आग ओकत आहे. उष्माघाताचे रुग्ण वाढले आहेत. नवऱ्या मुलीचा आहे उन्हाचा चटका बसल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

एसी गाडीमधील गारवा व पुन्हा प्री वेंडिंग शूटसाठी तप्त उन्हात बाहेर निघणे, यामुळे उन्हाचा फटका बसून ती दगावल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फॅड वाढले; सुरक्षिततेचे भान असावे

फ्री वेडिंग शूट करण्याचे फॅड अलीकडच्या काळात वाढले आहे. भारतीय संस्कृतीला हे शोभणारे नाही म्हणत संस्कृती जपणाऱ्यांकडून प्री-वेडिंगला विरोध होत आहे. तर अनेक वर्ग हा प्री वेडिंग च्या बाजूने आहे. शहरी भागातच नाही तर अगदी ग्रामीण भागामध्ये देखील प्री वेडिंगचे वेड लागलेले दिसून येते. प्री वेडिंग करताना काही दुर्घटना घडल्याची उदाहरणे आहेत. सुरक्षितता बाळगण्याऐवजी त्यामुळे एवढे मग्न होऊन शूट केले जात असल्याने उन्हाची देखील तमा बाळगली जात नाही. यातूनच या उपवर मुलीचा मृत्यू ओढवला असल्याची चर्चा होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top