mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

जिगाव प्रकल्पाच्या जलवाहिनीचे कोट्यवधींचे पाइप जळाले : Water pipeline pipes worth crores burnt

शेअर करा :

Water pipeline pipes worth crores burnt : शेगाव तालुक्यातील जलंब येथील रेल्वे स्टेशन परिसरातील जिगाव प्रकल्पासाठी ठेवलेल्या जलवाहिनीच्या पाइपलाइन खुल्या यार्डला २६ एप्रिल रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागून कोट्यवधी रुपयांचे पीव्हीसी पाइप जळून खाक झाले.


Water pipeline pipes worth crores burnt
भडकलेली आग

जलंबजवळ शेतात पाइपांच्या खुल्या यार्डला आग

बुलढाणा : शेगाव तालुक्यातील जलंब येथील रेल्वे स्टेशन परिसरातील जिगाव प्रकल्पासाठी ठेवलेल्या जलवाहिनीच्या पाइपलाइन खुल्या यार्डला २६ एप्रिल रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागून कोट्यवधी रुपयांचे पीव्हीसी पाइप जळून खाक झाले.

बुलढाणा व अकोला जिल्ह्यासाठी हरितक्रांती ठरणाऱ्या जिगाव प्रकल्प अंतर्गत सुमारे २५० किलोमीटरच्या क्षेत्रासाठी लागणारे पाइप जलंब – माटरगाव रोडवर खुल्या शेतामध्ये साठवून ठेवण्यात आले होते. लागलेल्या आगीमध्ये ज्वलनशील साहित्याचे पीयूसी पाइप असल्याने आग काही क्षणातच भडकली.

खामगाव, शेगाव, मलकापूर, नांदुरा व इतर ठिकाणाहून दहा अग्निशमन दलाने मोठी करत करून आगीवर नियंत्रण मिळविले. रात्रभर अथक प्रयत्न केल्यानंतर सकाळी आग विझविण्यात यश आले.

घटनेची माहिती समजताच जलंब ठाणेदार अमोल सांगळे व कर्मचारी, शेगाव तहसीलदार प्रज्ञा काकडे, डीवायएसपी प्रदीप पाटील, एएसपी श्रेणिक लोढा, तलाठी, जिगाव प्रकल्पाचे चोपडे व सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top