mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

समाजावर घातक परिणाम करणारा अवैध दारू विक्रेता तडीपार : Illicit liquor seller expelled for causing detrimental effect on society

शेअर करा :

Illicit liquor seller expelled for causing detrimental effect on society : अवैध दारू विक्री करून तरुण पिढीला व्यसनाधीनतेच्या आहारी नेणाऱ्या तथा समाजमनावर विपरीत परिणाम करण्यास कारणीभूत ठरलेल्या जामठी येथील अफसर बलदार बरडे या अवैध दारू विक्रेत्यास उपविभागीय अधिकाऱ्यांनी बुलढाणा जिल्ह्यातून दोन महिन्यांसाठी तडीपार केले आहे.


Illicit liquor seller expelled for causing detrimental effect on society
तडीपारीच्या कारवाईसाठी धाड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी

एसडीओंनी दिले आदेश : धाड पोलिसांनी दिला होता प्रस्ताव 

धाड : अवैध दारू विक्री करून तरुण पिढीला व्यसनाधीनतेच्या आहारी नेणाऱ्या तथा समाजमनावर विपरीत परिणाम करण्यास कारणीभूत ठरलेल्या जामठी येथील अफसर बलदार बरडे या अवैध दारू विक्रेत्यास उपविभागीय अधिकाऱ्यांनी बुलढाणा जिल्ह्यातून दोन महिन्यांसाठी तडीपार केले आहे. सर्व समाजासाठी घातक ठरणाऱ्या अफसरच्या तडीपारचा प्रस्ताव धाड पोलिसांनी पोलीस अधीक्षकांमार्फत सादर केला होता.

बुलढाणा जिल्ह्यात अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी कारवाईची कठोर पावले उचलली आहेत. कठोर कारवाई संदर्भात पोलिसांना सक्त सूचना देखील दिल्या आहेत. धाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जमती येथील अफसर बलदार बरडे (वय ३८) यांच्याविरुद्ध दारूचे विविध गुन्हे दाखल होते. त्याच्यामुळे.सामाजिक शांतता भंग होत होती. दारूच्या आहारी जाऊन लोक भांडण करायचे. युवापिढी दारूच्या नादाला लागली. त्यामुळे धाड पोलिसांनी २२ डिसेंबर २०२५ रोजी कलम ५६ (१) (अ) (ब) महाराष्ट्र पोलीस अधिनीयम अन्वये हद्दपार प्रस्ताव बुलढाणा येथील उपविभागीय दंडाधिकार्‍यांकडे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत दाखल करण्यात आला. हद्दपार प्रस्तावाच्या अनुषंगाने उपविभागीय दंडाधिकारी यांनी प्रस्तावित हद्दपार इसम यांस बाजू मांडण्यासाठी पुरेसा अवधी दिला. मात्र त्याच्यावर दाखल गुन्हे आणि करण्यात आलेली प्रतिबंधक कारवाई याचा विचार करून तसेच जामठी परिसरात होत असलेली अवैद्य दारू विक्री आणि त्यामुळे नवयुवकांवर तसेच जनसामान्यांवर होणारे दुष्परिणाम याची गांभीर्यता बघून, अफसर बरडे यास बुलढाणा जिल्ह्यातून ११ मी २०२६ रोजीच्या आदेशाप्रमाणे दोन महिन्यांकरिता हद्दपार केले आहे. धाड पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामीण भागातील अवैद्दरित्या दारू विक्री करणाऱ्या इसमांवर हद्दपारीची कारवाई करण्यात येणार असून, वेळप्रसंगी आणखी कठोर कारवाई धाड पोलीस स्टेशनकडून भविष्यात केली जाणार आहे.

ही महत्त्वाची बातमी वाचण्यासाठी समोरील लिंकवर क्लिक करा👉कन्यादानावेळीच पित्याचा दुर्दैवी मृत्यू

सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागिय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रताप दत्तात्रय भोस, पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे lसफौ प्रभाकर लोखंडे, पोहवा श्रीकृष्ण चव्हाण, नितीन इंगळे, इब्राहम पठाण, भास्कर जाधव पोहवा संजय भुजबळ (स्थागुशा), पोहवा प्रवीण इंगळे (उविपोअ कार्यालय) यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top