Consecration of sun rays at Daityasudan temple in Lonar : जागतिक कीर्तीच्या लोणार शहरात अद्भूत निसर्गाविष्कार पाहायला मिळतात. त्यापैकीच एक असलेल्या दैत्यसूदन मंदिरात १५ मेपासून सूर्यकिरणोत्सव सुरू झाला आहे. भगवान दैत्यसूदन यांच्या मूर्तीला किरणांचा अभिषेक होत आहे.

पाच दिवस चालणार किरणोत्सव
लोणार : जागतिक कीर्तीच्या लोणार शहरात अद्भूत निसर्गाविष्कार पाहायला मिळतात. त्यापैकीच एक असलेल्या दैत्यसूदन मंदिरात १५ मेपासून सूर्यकिरणोत्सव सुरू झाला आहे. भगवान दैत्यसूदन यांच्या मूर्तीला किरणांचा अभिषेक होत आहे. सकाळी ११ वाजेपासून ते दुपारी १ वाजेपर्यंत भाविकांना या विहंगम दृश्याचे दर्शन घडत आहे. आजपासून सलग पाच दिवस किरणोत्सवाची उधळण होणार आहे.
किरणोत्सवाचा हा अविष्कार पाहण्यासोबतच दैत्यसूदनाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. लोणार सरोवरात विविध प्राचीन मंदिरे आढळतात. सभोवतालीदेखील अशी मंदिरे आहेत. त्यातीलच एक सुबक दगडी कोरीव कलाकुसर असलेले प्राचीन दैत्यसूदन मंदिर होय. एक हजार वर्षे जुने असलेले हे मंदिर शहराच्या सौंदर्यात भर घालत आहे. हा अनमोल ठेवा जपला जात आहे.
अधिक बातम्यांसाठी करा या लिंकवर क्लिक 👉https://mahadesha.com/
या मंदिराची कलाकुसर थेट कोनार्कच्या सूर्य मंदिराशी मिळतीजुळती आहे. भगवान विष्णूंच्या दैत्यसूदन अवताराला समर्पित असलेले हे मंदिर पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होते.


