mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

बुलढाणा जिल्ह्यात पत्नीच्या हत्येच्या दोन घटना : Two cases of wife’s murder in Buldhana district

शेअर करा :

Two cases of wife’s murder in Buldhana district:रागाच्या भरात पतीकडून पत्नीच्या हत्याकांडाच्या दोन घटनांनी जिल्हा हादरून गेला.

Two cases of wife's murder in Buldhana district

कौटुंबिक वादातून आरोपी पतींचे क्रूर कृत्य

बुलढाणा : रागाच्या भरात पतीकडून पत्नीच्या हत्याकांडाच्या दोन घटनांनी जिल्हा हादरून गेला. पतीने पत्नीच्या डोक्यावर लोखंडी सब्बलने वार करून हत्या केल्याची पहिली घटना खामगाव येथे १४ मेच्या रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. तर जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ बुद्रूक येथे रागाच्या भरात पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची दुसरी घटना १५ मेच्या पहाटे सव्वाचारला घडली.

कौटुंबिक कलहातून घडलेल्या या घटनांनी बुलढाणा जिल्हा हादरून गेला आहे. खामगाव शहरातील रेल्वे गेट परिसरामधील झोपडपट्टी भागात राहणारा प्रकाश रुपलाल सोळंके (वय २५) याने पत्नी सविता सोळंके (वय २२) हिच्या डोक्यात लोखंडी सब्बलने वार करून क्रूरपणे हत्या केली. नंतर त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. प्रकाश व पत्नी सविता यांच्यात कौटुंबिक कारणावरून १४ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास वाद झाला. त्यांच्यातील वाद एवढा वाढला की प्रकाशने पत्नीला कायमचे संपवून टाकले. त्याच परिसरात राहणारे संजय मेढे घरी गेले असता आरोपी प्रकाशच्या हातात लोखंडी सब्बल आढळून आली, तर सविता रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. ‘मी सविताला मारले असून स्वत: पोलीस स्टेशनला जात आहे’ म्हणत आरोपी प्रकाश पोलिसांसमोर हजर झाला.

संजय मेढे यांच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विकास पाटील करीत आहेत.

दुसरी पत्नीच्या हत्येची घटना जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ बुद्रुक येथे १५ मे रोजी पहाटे सव्वाचार वाजेच्या सुमारास घडली. आरोपी शहादेव शंकर भारसाकळे याने कौटुंबिक रागाच्या भरात आपली पत्नी मायावती शहादेव भारसाकळे (वय ४६) यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने गंभीर वार केले. या हल्ल्यात मायावती रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळल्या. आईचा ओरडण्याचा आवाज आल्याने मुलगा मंगेश (वय २३) धाव आला. त्याने आईला उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून आईला मृत घोषित केले.

महत्वाच्या बातम्यांसाठी या लिंक वर क्लिक करा👉https://mahadesha.com/

मंगेश भारसाकळे याच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी वडील शहादेव भारसाकळेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन, पोलीस निरीक्षक नितीनकुमार पाटील, पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे आणि पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीनकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय स्नेहा शेडगे करीत आहेत. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top