Car overturned while fleeing after hitting bike : मुंबई ते नागपूर राज्य महामार्गावर डोणगाव ते मेहकरदरम्यान गुरुवार, २१ मे २०२६ च्या रात्री आठच्या सुमारास भरधाव कारने घाटबोरीकडे जाणाऱ्या दुचाकीस उडविले. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. तर धडक देऊन पसार होणाऱ्या कारला देखील पुढे अपघात झाला.


कारचालकासह दुचाकीस्वार दोघे जखमी
आसिफ शाह
मेहकर : मुंबई ते नागपूर राज्य महामार्गावर डोणगाव ते मेहकरदरम्यान गुरुवार, २१ मे २०२६ च्या रात्री आठच्या सुमारास भरधाव कारने घाटबोरीकडे जाणाऱ्या दुचाकीस उडविले. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. तर धडक देऊन पसार होणाऱ्या कारला देखील पुढे अपघात झाला. या घटनेत दोन दुचाकीस्वार आणि कारचालक गंभीर जखमी झाला.
भरधावं कार नागापूर जवळील ब्रेकर वर कंट्रोल न करता आल्याने सरळ रस्ता खाली नेली पलटी झाली ज्यात तो स्वतः गंभीर जखमी झाला त्याला सुद्धा उपचारासाठी मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.
घाटबोरी येथील हर्षद सरडे व उमेश बासटवार हे मेहकरवरून मोटारसायकलने घाटबोरीकडे जात असताना डब्ल्यूबी – ०६ – जी – ०२३२ क्रमांकाच्या ओल्स व्हॅगन कारने ( महादेशा न्यूज ) दुचाकीला मागून धडक दिली. त्यामुळे रोडवर पडून ते गंभीर जखमी झाले. याची माहिती डोणगाव पोलीस स्टेशनला मिळताच पोलिसांनी नाकाबंदी करत ( महादेशा न्यूज ) असताना माहिती मिळाली की, नागापूरजवळील ब्रेकरवर एक कार उलटली. तेव्हा हर्ष सेहगल व जाकीर चौधरी व चालक यश चव्हाण यांनी नागापूर गाठून गावकऱ्यांच्या मदतीने ती कार सरळ केली. त्यात असलेल्या झारखंड येथील चालकाला बाहेर काढले. तेव्हा समजले की अंजनी येथून भरधाव कारणे जो अपघात अपघात करून (महादेशा न्यूज ) पळून जात असलेला तो हाच ड्रायव्हर होता. यावर डोणगाव पोलिसांनी जखमी असलेल्या झारखंड येथील तो कारचालक याला १०८ च्या ॲम्बुलन्स मध्ये बसून मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले हा कारचालक मद्यपी होता. अपघाताच्या वेळी सुद्धा तो मद्य प्यालेला होता. अशी माहिती अपघाताच्या वेळी बचाव करणाऱ्या लोकांनी सांगितले तर या अपघातामधील त्या दोन दुचाकी स्वारांना मेहकर येथील खाजगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले.
अपघात करून भरधाव वेगाने निघणाऱ्या हा कारचालक नागापूर येथील ब्रेकर धडकला नसता तर डोणगावमध्ये निश्चितच त्याने मोठा अपघात केला असता. डोणगाव येथे रोडवर नेहमीच रहदारी असते. अशात हा मद्यपी कारचालक डोणगाव येथे मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरला असता.


