There was a riot at the petrol pump, dial number 112 : पेट्रोल पंपांवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिस मदत मिळण्यासाठी ११२ क्रमांक डायल करा, असे आवाहन मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी केले आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांचे आवाहन
आसिफ शाह
मेहकर : सध्या संपूर्ण मेहकर तालुक्यामध्ये डिझेल व पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला आहे. पेट्रोल, डिझेल घेण्यासाठी झुंबड उडत आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेत जिथेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, त्या ठिकाणी पोलिस मदत मिळण्यासाठी ११२ क्रमांक डायल करा, असे आवाहन मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी केले आहे.
मेहकर उपविभाग (पोलीस) अंतर्गत येणाऱ्या पेट्रोल पंपावरील परिस्थिती पाहता झाडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे हे आवाहन केले आहे. कोणत्याही व्यक्तीने काळाबाजार करण्याकरिता पेट्रोल व डिझेलचा साठा करू नये; अन्यथा जीवनावश्यक वस्तु कायदा १९५५ चे अनुषंगाने योग्य कार्यवाही करण्यात येईल. तसेच उपविभागातील पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणारे (महादेशा न्यूज) पेट्रोल व डिझेल पंप येथे नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच नागरिक व पेट्रोलपंप धारक व त्यांचे आस्थापनेवरील कर्मचारी यांच्यात वाद होऊन कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन शांतता भंग होऊ नये, यासाठी पोलीस स्टेशनमधून नियमितपणे गस्त घातली जाणार आहे. (महादेशा न्यूज) या परिस्थितीवर पोलीस विभागामार्फत लक्ष ठेवण्यात येत आहे. कोणत्याही नागरिकांना काही तक्रार, अगर अडचण असल्यास संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा अथवा ११२ या क्रमांकावर माहिती द्यावी. (महादेशा न्यूज) नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियम व कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन एसडीपीओ संतोष खाडे यांनी केले आहे.


