mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

पेट्रोल, डिझेलची साठेबाजी करणाऱ्याची माहिती द्या : Report anyone hoarding petrol and diesel

शेअर करा :

Report anyone hoarding petrol and diesel : पेट्रोल व डिझेलचा अवैध साठा करून चढ्या भावाने विक्री होत असल्याने यासंदर्भातील माहिती पुरवठा विभागाला द्या, असे आदेश महसूल सेवक व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना तहसीलदारांनी दिले आहेत.

Report anyone hoarding petrol and diesel
पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी ठिकठिकाणीच्या पेट्रोल पंपांवर अशा कॅन घेऊन लागलेल्या रांगा

महसूल सहाय्यक व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना पत्र देऊन विक्रीवर नजर ठेवण्याचे तहसीलदारांचे आदेश


आसिफ शाह


मेहकर : तालुक्यातील काही ठिकाणी पेट्रोल व डिझेलचा अवैध साठा करून चढ्या भावाने विक्री होत असल्याने यासंदर्भातील माहिती पुरवठा विभागाला द्या, असे आदेश महसूल सेवक व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना तहसीलदारांनी दिले आहेत. तसे पत्र जारी करण्यात आले आहे.

मेहकर पुरवठा विभागाने महसूल सहाय्यक व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले की, मेहकर तालुक्यात पेट्रोल व डिझेलची टंचाईसदृश परिस्थिती आहे. (महादेशा न्यूज) सदर परिस्थितीचा विचार करता ग्रामीण भागात पेट्रोल व डिझेलची नागरिकांकडून साठेबाजी तसेच अवैध विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

त्या अनुषंगाने सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक यांनी, ग्रामीण भागात अवैध पेट्रोल व डिझेल साठेबाजी तसेच विक्री होत असल्याचे आढळल्यास तहसील कार्यालयास तातडीने अवगत करण्यात यावे. अशी कुठल्याही प्रकारची साठेबाजी करणाऱ्या व्यक्ती/संस्थेविरुद्ध पेट्रोलियम नियम २००२ मधील नियम १९८ ते २०२ व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीनुसार दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल, (महादेशा न्यूज) याबाबत संबंधितास सुचित करावे, असे या पत्रात नमूद आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉https://mahadesha.com/

एकीकडे शेतीसाठी शेतकऱ्यांना डिझेल पाहिजे तर दुसरीकडे मोक्याचा फायदा उचलणारे काळाबाजार करणारे सरसावले असून लहान-मोठ्या वाहनांना लागणारे डिझेल व त्यांना नंबर मध्ये लागून डिझेल घ्यायला परवडत नसल्याने अशा लोकांना १३० ते १४० रुपये लिटर डिझेल विकत आहेत. (महादेशा न्यूज) तर पेट्रोल दीडशे रुपये लिटर विकले जात आहे. अशा लोकांना लगाम घालणे गरजेचे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top