mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

flag filled with inspiration : पाचशे फूट तिरंगा ध्वजाने भरली स्फूर्ती 

शेअर करा :

flag filled with inspiration : तिरंगा हा आपल्या भारत देशाचा प्राण आणि आण, बाण, शान आहे. प्रत्येक भारतीय नागरिक अभिमानाने राष्ट्रध्वजाला सलामी देतो. प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला नांदुरा शहरातून नवमतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती करण्यासाठी तिरंगा रॅली काढण्यात आली.

flag filled with inspiration




राष्ट्रीय मतदारदिनी रॅली 

बुलढाणा : तिरंगा हा आपल्या भारत देशाचा प्राण आणि आण, बाण, शान आहे. प्रत्येक भारतीय नागरिक अभिमानाने राष्ट्रध्वजाला सलामी देतो. प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला नांदुरा शहरातून नवमतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती करण्यासाठी तिरंगा रॅली काढण्यात आली. ही रॅली विशेष आकर्षण ठरली.

रॅलीच्या माध्यमातून मतदार आणि मतदान याविषयी व्यापक जनजागृती करण्यात आली. अठरा वर्षे वय पूर्ण झालेल्या नवमतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने २५ जानेवारीला ही आगळेवेगळे आयोजन करण्यात आल्याचे तहसीलदार अजितराव जंगम यांनी सांगितले. ज्ञानपीठ विद्यालयापासून सुरुवात झाली. नगराध्यक्षा मंगलाताई मुऱ्हेकर यांनी रॅलीला झेंडा दाखविला. नांदुरा शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करीत ज्ञानपीठ विद्यालयातच रॅलीचा समारोप झाला. तत्पूर्वी मतदारदिनानिमित्त उपस्थितांना शपथ देण्यात आली. रॅलीमध्ये शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, महसूल कर्मचारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

flag filled with inspiration

राष्ट्रीय एकात्मतेचाही संदेश

मतदार जागृतीसाठी रॅली असली तरी या माध्यमातून एक स्फूर्ती निर्माण करीत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेशदेखील देण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top