Sexual exploitation under the pretext of marriage! : दोन, अडीच वर्षांपूर्वी सैलानी येथे यात्रेनिमित्त आलेल्या अल्पवयीन मुलीस प्रेम जाळ्यात ओढून साकेगावच्या आशिक नावाच्या तरुणाने लग्नाचा बहाणा केला आणि वारंवार लैंगिक अत्याचार केला.
सैलानी यात्रेत टाकला प्रेमाचा फास : साकेगावच्या आशिकला रायपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सैलानी : दोन, अडीच वर्षांपूर्वी सैलानी येथे यात्रेनिमित्त आलेल्या अल्पवयीन मुलीस प्रेम जाळ्यात ओढून साकेगावच्या आशिक नावाच्या तरुणाने लग्नाचा बहाणा केला आणि वारंवार लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने पोलिसात धाव घेतल्यानंतर ठाणेदार निलेश सोळंके यांनी आशिकची वासनांध आशिकी उतरवून त्याला बेड्या ठोकल्या.
सैलानी येथे सैलानी बाबांची मार्च महिन्यात होळीच्या पाचव्या दिवशी मोठी यात्रा भरते. या यात्रेत हौसे, गवसे, नवसे असे सर्व प्रकारचे लोक येतात. देऊळगाव राजा येथील एक अल्पवयीन मुलगी देखील २०२४ मध्ये आली होती. यात्रेदरम्यान चिखली तालुक्यातील साकेगावचा आशिक रिवाज पवार याची त्या मुलीशी गाठ पडली. त्याने तिला आपल्या प्रेम जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखविल्यामुळे ती देखील प्रेमात आंधळी झाली. मात्र तिच्या मनाविरद्ध आशिक याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर मात्र लग्नास नकार दिला. लग्नाचे वय नसताना देखील ती त्याच्याकडे आकर्षित झाली होती. याचाच गैरफायदा घेत त्याने तिचे सर्वस्व लूटले. वारंवार लैंगिक अत्याचार केले. अखेर पीडित मुलीने रायपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. आशिक पवार याच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी बलात्कार व पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला.
ठाणेदार नीलेश सोळंके यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास पथक नेमून तिच्या शोधार्थ रवाना केले. पोलीस कर्मचारी दशरथ शितोळे, राहुल जाधव, अनंत कळमकर, अख्तर शेख यांच्या टीमने काही तासांतच आरोपीचा शोध लावून त्याला अटक केली.
गुन्ह्याचा तपास ठाणेदार सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गिरीशकुमार पाटील व लक्ष्मण शिंदे हे करीत आहेत.


