mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

उष्माघाताने घेतला ज्ञानेश्वरचा बळी : Heatstroke claimed the life of Dnyaneshwar

शेअर करा :

Heatstroke claimed the life of Dnyaneshwar : मेहकर येथे लोणार तालुक्यातील अजिसपूर येथील एकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.


मेहकर येथील सोनाटी रोडवर मल्टी हॉस्पिटलच्या बाजूला आढळला मृतदेह


Heatstroke claimed the life of Dnyaneshwar Heatstroke claimed the life of Dnyaneshwar

आसिफ शाह

मेहकर : यावर्षी सूर्यनारायण चांगलाच कोपला आहे. तापमान ४२ ते ४३ डिग्रीपर्यंत राहत असल्याने अनेकांना उष्माघाताचा फटका बसत आहे. मेहकर येथे लोणार तालुक्यातील अजिसपूर येथील एकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सुरुवातीला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. नंतर पोलिसांनी त्याची ओळख पटवली. त्याचा उष्माघाताने बळी गेल्याचे निष्पन्न झाले.

ज्ञानेश्वर सीताराम खोसरे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो मूळचा लोणार तालुक्यातील अजिसपूरचा रहिवासी आहे. मेहकर येथील सोनाटी रोडवर मल्टी हॉस्पिटलच्या बाजूला २८ मे २०२६ रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला होता. याबद्दल माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतकाची फोटो ओळख पटवण्यासाठी सोशल मीडियावर फोटो व्हायरल केले. मृतकाची ओळख पटली. त्याचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला.

उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, ठाणेदार व्यंकटेश आलेवार, पोलीस उपनिरीक्षक बिरांजे, पोलीस उपनिरीक्षक कांचन जारवाल, पोलीस हेडकॉन्स्टेबल लक्ष्मण कटक, प्रभाकर शिवणकर यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. त्या ठिकाणी अंदाजे ३५ वर्षीय इसम मृतावस्थेत दिसून आला. अंगावर कोणती जखम नव्हती. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आला. त्यानंतर त्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मृतदेहाचे फोटो टाकून जनतेला आवाहन करण्यात आले. मृतकाच्या नातेवाइकांनी २९ मेच्या रात्री अडीच वाजेदरम्यान मेहकर पोलिसांशी संपर्क साधला. हा मृतदेह ज्ञानेश्वर सीताराम खोसरे याचा असल्याचे समजले. मूळचा लोणार तालुक्यातील अजिसपूरचा रहिवासी असून सध्या चिखली तालुक्यातील वाघजाळ येथे राहत होता. उष्माघाताने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

लग्नाच्या बहाण्याने लैंगिक शोषण!👉https://mahadesha.com/sexual-exploitation-under-the-pretext-of-marriage/

सध्या मे महिन्याचे शेवटचे दिवस असून नवतपा म्हणून या दिवसाला संबोधले जाते. या उन्हामध्ये दाहकता असल्याने त्याचा फटका बसल्यास व्यक्ती दगावू शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top