mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

A moisture of patriotism : देशप्रेमाचा ओलावा; सव्वाचार लाख विद्यार्थ्यांची देशभक्तीपर कवायत

शेअर करा :

A moisture of patriotism : पोलिस कवायत मैदानावर देशभक्तीची लाट उसळल्याचे चित्र सोमवारी प्रजासत्ताकदिनाला पाहायला मिळाले. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांच्या तालावर सामूहिक कवायती पार पडल्या.

The moisture of patriotism

१७ हजार शिक्षकही सहभागी 

शरद माळोदे

बुलढाणा : राज्य शासनाच्या शालेपोलिस कवायत मैदानावर देशभक्तीची लाट उसळल्याचे चित्र सोमवारी प्रजासत्ताकदिनाला पाहायला मिळाले. शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांच्या तालावर सामूहिक कवायती पार पडल्या.

या उपक्रमास बुलढाणा जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील चार लाख तीस हजार ७०४ विद्यार्थ्यांनी सामुदायिक कवायतीत सहभाग नोंदवला. सोबत १७०१३ शिक्षकांनी शाळांमधून या कवायतीचे दिमाखदार आयोजन केले. 

जिल्ह्याचे मुख्य शासकीय कवायत संचलन बुलढाणा पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता आयोजित करण्यात आले होते. या संचालनात बुलढाणा शहरातील सात शाळांमधील २९०९ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. अत्यंत शिस्तीत आणि दिमाखदार सोहळा बुलढाणा शहरवासीयांनी अनुभवला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडले. त्यानंतर सामुदायिक कवायत घेण्यात आली. या प्रसंगी आमदार संजय गायकवाड, शहराच्या नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, सर्व उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख, बुलढाणा शहरातील सर्व खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक व योजना कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top