151 donors salute : उत्कृष्ट पोलिसिंग करतानाच धाड पोलिसांनी सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय कार्य काय असते याचा प्रत्यय सर्वांना दिला आहे. प्रजासत्ताकदिन आणि कम्युनिटी पोलिसिंगनिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात आधी पोलिसांनी रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केले. या कार्यात युवकांनीदेखील हिरीरीने पुढाकार घेत रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचा संदेश दिला.

धाड पोलिसांना सलाम; रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
धाड : उत्कृष्ट पोलिसिंग करतानाच धाड पोलिसांनी सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय कार्य काय असते याचा प्रत्यय सर्वांना दिला आहे. प्रजासत्ताकदिन आणि कम्युनिटी पोलिसिंगनिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात आधी पोलिसांनी रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केले. या कार्यात युवकांनीदेखील हिरीरीने पुढाकार घेत रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचा संदेश दिला.
धाड पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रताप भोस व पोलीस पाटील यांनी या शिबिराचे आयोजन करून राष्ट्रभक्तीची ज्योत पोलीस आणि युवकांच्या मनात पेटवली. २६ जानेवारी रोजी झेंडावंदन झाल्यानंतर सकाळी दहा वाजता शिबिराला सुरुवात झाली. यावेळी धाड सरपंच सावित्रीबाई बोर्डे, माजी सरपंच दिगंबरनाना जाधव, देवीदास पाटील, बबलू वाघूर्डे, अनिल कुटे, विष्णू वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरासाठी पोलीस पाटील संघटना, डॉक्टर असोसिएशनचे सर्व डॉक्टर, व्यापारी आणि युवकांनी परिश्रम घेतले.
रक्तदात्यांचे ठाणेदारांनी मानले आभार
रवींद्र माळोदे, जीवन अंभोरे, गणेश तायडे, विजय तायडे, डॉ. संदीप कानडजे, आकाश आघाव, गजानन रावळकर, शंकर वाघ, सुरज जाधव, रामदास अवसरमोल, आनंदा खेडकर, मंगेश उबरहंडे, मनीष पालकर, प्रमोद गिरी, स्वप्नील साखळे, आदित्य वैद्य, ऋषिकेश जाधव, विजय तायडे, कृष्णा जाधव, रवी बावस्कर, अमोल बशिरे, अनिल ताम्हणे, भगवान सपकाळ, रामेश्वर सपकाळ, शेख साबीर, लक्ष्मण काटे, मधुर पडोळ, निलेश भिवशंकर, मंगेश बोराडे, कुमोद जाधव, देवेंद्र मुळे, इमरान पठाण, नितिन माळोदे, योगेश मुराडे, सागर गायकवाड, पंजाबराव नरोटे, भास्कर जाधव यांच्यासह १५१ जणांनी रक्तदान केले. या सर्वांचे ठाणेदार भोस यांनी आभार मानले.
महिलांचाही पुढाकार
ठाणेदार प्रताप बोस यांच्या पत्नी मीनाक्षी भोस तसेच छाया गोमलाडू व वैशाली कोरडे यांनीसुद्धा रक्तदान करून महिला राष्ट्रीय कार्यात मागे नसल्याचे दाखवून दिले.

