mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

चिखलीजवळ भीषण अपघात : Horrific Accident Near Chikhali

शेअर करा :

Horrific Accident Near Chikhali : चिखलीजवळ भीषण अपघात; वॅगनारने घेतला एकाचा बळी; दुसरा गंभीर

Horrific Accident Near Chikhali


चिखली : भरधाव वेगातील वॅगनार कारने दुचाकीला धडक दिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. चिखली शहरानजीक पळसखेड जयंती फाट्याजवळ १ जूनच्या सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.

अक्षय रमेश कुळसुंदर (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो चिखली येथील रहिवासी होता. तर वैभव सोपान गवारे हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैभव गवारे व अक्षय कुळसुंदर हे दुचाकीने चिखली ते बुलढाणा मार्गाने जात असताना एमएच-४९-बीबी-६३४६ क्रमांकाच्या वॅगनार कारने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.या अपघातात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, अक्षयचा मृत्यू झाला होता.

भालगाव येथील ॲड. शंकर चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून वॅगनार कारचालकाविरुद्ध चिखली पोलिसांनी बीएनएस कलम १०६ (१), १२५ (बी), २८१ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोहेकॉ सूर्यकला मस्के करीत आहेत.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top