mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

घाटबोरी वनक्षेत्राजवळच सागवानाची अवैध वृक्षतोड : Illegal felling of teak trees without permission near Ghatbori forest area

शेअर करा :

Illegal felling of teak trees without permission near Ghatbori forest area : घाटबोरी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या व मुख्यालयापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या नागेशवाडी येथील शेतकऱ्याच्या शेतामध्ये असलेली सागवानाची झाडे विनापरवाना तोडण्यात आली.


नागेशवाडी येथे सागवानाच्या ५७ झाडांची कत्तल होईपर्यंत वनविभाग अनभिज्ञ कसा?


Illegal felling of teak trees without permission near Ghatbori forest area

आसिफ शाह

मेहकर : घाटबोरी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या व मुख्यालयापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या नागेशवाडी येथील शेतकऱ्याच्या शेतामध्ये असलेली सागवानाची झाडे विनापरवाना तोडण्यात आली. याप्रकरणी सर्वत्र वाच्यता झाल्यानंतर शेवटी ५७ झाडे तोडल्याप्रकरणी वनविभागाने पंचनामा केला. या ठिकाणावरून दीड किमी अंतरावर मुख्यालय असूनसुद्धा मौल्यवान सागवानाची कत्तल होईपर्यंत वन विभागाला जाग आली कशी नाही, असा सवाल केला जात आहे.

दुसरीकडे शेतकऱ्यांना रीतसर परवानगी मागितली असता सागवान झाडे तोडण्याची परवानगी का दिल्या गेली नाही, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

चिखलीजवळ भीषण अपघात; एक ठार, एक गंभीर ही बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा👉 https://mahadesha.com/horrific-accident-near-chikhali/

सध्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिल्हा उपवनसंरक्षक म्हणून जमीर शेख रुजू झाले असून त्यांनी कारवायांचा धडाका लावला आहे. बुलढाणा जिल्ह्यात कित्येक सॉ मिलवर कारवाया झाल्या तर दुसरीकडे घाटबोरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या ग्राम नागेशवाडी येथील पांडुरंग सीताराम शेळके यांच्या शेतामध्ये असलेली सागवान झाडे त्यांनी २ जूनच्या सकाळपासून तोडायला सुरुवात केली. विशेष म्हणजे झाडे कापण्यासाठी मशीनचा सुद्धा उपयोग करण्यात आला. याची माहिती वन विभागाला सुद्धा देण्यात आली. मात्र वनविभागाने कोणतीच दखल न घेतल्याने या ठिकाणी ५७ झाडे कापल्या गेली. त्यानंतर त्या ठिकाणी वन विभाग पोहोचले व पंचनामा केला.

याप्रकरणी माहिती घेतली असता शेतकऱ्याने वनविभागाकडे वारंवार त्याच्या शेतामधील असलेले सागवान वृक्ष तोडण्याकरिता परवाना मागितला. मात्र हा परवाना मिळाला नाही. तेव्हा परत जिल्ह्यातील ठेकेदाराने वनविभागाच्या संगनमताने सागवान झाडे तोडण्याची चर्चा नागेश वाडी व घाटबोरी परिसरामध्ये रंगली. त्या ठिकाणी किती झाडे तोडल्या गेली, शेतकऱ्याने रीतसर परवानगी मागितली होती ती त्या शेतकऱ्याला का दिला गेली नाही, ती झाडे नक्की त्याच शेतकऱ्याच्या शेतामधली होती की इतर कुठल्या? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

जिल्हा कार्यालयामधून फोन आले तेव्हा ठेकेदाराला सांगितले गेले की आत्ता बंद करा, तोपर्यंत सागवान कत्तल सुरूच होती.

यापूर्वी २०२३ मध्ये घाटबोरी वनपरिक्षेत्रामध्ये सागवान तोडीचे प्रकरण खूप गाजले होते. अशातच पुन्हा अशाच प्रकारे हे सागवान तोडी तर झालेली नाही ना याची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्याकडून होणे गरजेचे आहे. तसेच प्रत्यक्ष जंगलात जाऊन सुद्धा पाहणी होणे गरजेचे आहे.

 

 

आम्हाला माहिती मिळाल्यानंतर वन कर्मचारी हे त्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला. सदर सागवान हे त्या शेतकऱ्यांच्या शेतातील असून त्यांनी तोडण्यासाठी परवानगी मागितलेली आहे. मात्र वन सर्वेअर हे पडताळणीसाठी गेले असता कागदपत्राची पूर्तता न झाल्याने प्रकरण प्रलंबित आहे. 

अंकुश येवले 

वनपरिक्षेत्र अधिकारी, घाटबोरी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top