mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

दूधा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर : Free Eye Check-up Camp at Dudha

शेअर करा :

Free Eye Check-up Camp at Dudha : दूधा येथे जागतिक नेत्रदान दिनानिमित्त जनजागृती व मोफत नेत्र तपासणी शिबिर

Free Eye Check-up Camp at Dudha


दूधा, दि. १० जून : समाजातील अंधत्व निर्मूलनासाठी नेत्रदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जागतिक नेत्रदान दिनानिमित्त महात्मा गांधी प्रशासकीय सेवा महाविद्यालय, दूधा येथे मरणोत्तर नेत्रदान जनजागृती व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग व जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिरात उपस्थित नागरिकांना नेत्रदानाचे सामाजिक महत्त्व, मरणोत्तर नेत्रदानाची प्रक्रिया, नेत्रदानासंदर्भातील गैरसमज आणि अंधत्व निर्मूलनासाठी प्रत्येकाने उचलावयाची जबाबदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला व उपचाराबाबत माहिती देण्यात आली.

Free Eye Check-up Camp at Dudha

यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथील जिल्हा नेत्र चिकित्सक डॉ. साईनाथ तोडकर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, रायपूर येथील नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ. नलिनी पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी नेत्रदानामुळे अनेक अंध व्यक्तींना दृष्टीदान मिळू शकते, त्यामुळे प्रत्येक नागरिकाने नेत्रदानाचा संकल्प करून या सामाजिक चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

Free Eye Check-up Camp at Dudha

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी गावचे सरपंच गणेश निकम, ग्रामपंचायत सदस्य स्वास्तिक काळे, सामाजिक कार्यकर्ते दादाराव राऊत, उपसरपंच जीवन सोनवणे, संस्थेचे अध्यक्ष तुकाराम कड, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. सौ. एम. जे. तुपकर यांनी नेत्रदानाचे महत्त्व अधोरेखित करणारे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. वैशाली जाधव यांनी केले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. भरत धंदर, प्रा. वैभव इंगळे, प्रा. विनोद इंगळे, प्रा. पवन सोनूने, प्रा. सूरज पवार,  भागवत सोनूने तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमामुळे नेत्रदानाविषयी जनजागृती होण्यास मोठी मदत झाली असून परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top