mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

लग्नाच्या चौदाव्या दिवशी बालविवाह उघड : Child marriage comes to light on the fourteenth day of marriage.

शेअर करा :

Child marriage comes to light on the fourteenth day of marriage. : लग्नाच्या चौदाव्या दिवशी बालविवाह उघड पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Child marriage comes to light on the fourteenth day of marriage.


चाइल्ड : हेल्पलाइनवर प्राप्त झाली तक्रार  

बुलढाणा  लग्नानंतर चौदाव्या दिवशी चाइल्ड हेल्पलाइनवर तक्रार प्राप्त होताच बालविवाह उघडकीस आला. या प्रकरणी वडनेर भोलजी येथील युवकासह तीन नातेवाइकांविरुद्ध नांदुरा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

निंबोळा देवी संस्थानवर ३० मे रोजी नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथील करण देवीदास बोरले याच्यासोबत अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावण्यात आला. १२ जून रोजी यासंदर्भात तक्रार प्राप्त झाली होती.

महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत चाइल्ड हेल्पलाइन, जिल्हा बाल संरक्षण कक्षाने ही कारवाई केली. चाइल्ड हेल्पलाइनच्या १०९८ क्रमांकावर नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे एका अल्पवयीन बालिकेचा बालविवाह होत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. प्राप्त तक्रारीनुसार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे तसेच बालकल्याण समितीचे अध्यक्ष मनोज डांगे यांच्या मार्गदर्शनात चाइल्ड हेल्पलाइनचे प्रकल्प समन्वयक शेख सोहेप, समुपदेशक विद्या खरे, पर्यवेक्षक सागर नरवाडे, प्रवीण गवई, केस वर्कर मुकेश मोरे, राहुल सुरडकर यांनी तत्काळ बालविवाह घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गावपातळीवर ग्राम बाल संरक्षण समिती तसेच ग्रामीण भागातील बालविवाह बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, ग्रामसेवक तसेच संबंधित पोलीस स्टेशनला बालविवाहाबाबत प्राप्त तक्रारीची माहिती पत्रान्वये दिली.

हा बालविवाह रोखण्याकरिता कळविल्यानंतर चाइल्ड हेल्पलाइनच्या टीमने संबंधित पोलीस स्टेशन, पोलीस हेल्पलाइन ११२, बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्यासोबत समन्वय साधून वडनेर भोलजी गाठले. चौकशी केली असता बालिकेचा बालविवाह झाल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी चाइल्ड हेल्पलाइनच्या बुलडाणा टीमने सदर प्रकरणात बालकल्याण समितीला माहिती दिली. तसेच यासंदर्भात पुढील कार्यवाहीकरिता बालिकेला संबंधित यंत्रणेच्या मदतीने बालकल्याण समितीसमोर हजर केले. समितीच्या अध्यक्ष व सदस्यांनी पीडित मुलीची चौकशी केली. बालविवाह झाल्याचे लक्षात आल्यानंतर कायदेशीर कारवाईचे आदेश समितीने दिले. त्यानुसार १६ जून २०२६ रोजी बालिकेच्या बालविवाह प्रकरणात नांदुरा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली. बालविवाह प्रतिबंध अधिकारी विकास शिवदे यांच्या तक्रारीवरून करण देवीदास बोरलेसह चार जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ नुसार विविध कलमान्वये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top