mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

टीओडी (स्मार्ट) मीटरमुळे ग्राहकांना मिळाली १.९५ कोटीची सवलत : Customers received a concession of 1.95 crore due to ToD (smart) meters

शेअर करा :

Customers received a concession of ₹1.95 crore due to ToD (smart) meters : महावितरणच्या स्मार्ट टिओडी मीटरमुळे वीज ग्राहकांना दिवसा वीज वापरावर जुलै २०२६ पासून सवलत मिळत असून अकोला परिमंडळातील वीज ग्राहकांना जुलै २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत १ कोटी ९५ लाख ५७ हजार रूपये सवलत मिळाली आहे.


Customers received a concession of ₹1.95 crore due to ToD (smart) meters

टीओडी मीटर असेल तरच दिवसा वीज वापराचा वीज ग्राहकांना फायदा

बुलढाणा : महावितरणच्या स्मार्ट टिओडी मीटरमुळे वीज ग्राहकांना दिवसा वीज वापरावर जुलै २०२६ पासून सवलत मिळत असून अकोला परिमंडळातील वीज ग्राहकांना जुलै २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत १ कोटी ९५ लाख ५७ हजार रूपये सवलत मिळाली आहे.

महावितरणकडून राज्यातील घरगुती वीजग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी (टाइम ऑफ डे) मीटर लावण्यात येत आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी निश्चित केलेल्या वीजदरामध्ये घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीजदरात सवलत; मिळण्याचा प्रत्यक्ष फायदा १ जुलैपासून सुरु झाला असून जुलै २०२५ ते मार्च २०२६ पर्यंत असलेल्या प्रति युनिच ८० पैसे असलेल्या सवलतीत वाढ होवून एप्रिल पासून ही सवलत प्रति युनिट ८५ पैसे झाली आहे.

यासोबतच आधुनिक तंत्रज्ञावर आधारीत असलेले टिओडी स्मार्ट मीटरचे  रीडिंग ऑटोमॅटिक आणि अचूक होणार  असल्याने बिलींगबाबतही अचुकता आली आहे. त्याशिवाय घरातील विजेचा वापर दर तासाला संबंधित ग्राहकांना मोबाईलवर पाहता येणार असल्याने ग्राहकांचे वीज वापरावरही थेट नियंत्रण ठेवता येणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या वीज वापरावर प्रति युनिटची सवलत असल्याने या कालावधित घरातील प्रामुख्याने वॉशिंग मशीन, गिझर, एअर कंडिशनर व इतर जास्त वीज पावरणाऱ्या उपकरणाचा वापर केल्यास त्याचा थेट आर्थिक  फायदा वीज ग्राहकांना होणार आहे.

परिमंडळात आतापर्यंत ३ लाख ८२ हजार ७०३ स्मार्ट टिओडी मीटर लागले असून यात लघुदाब ग्राहकांकडे ३ लाख ३९ हजार ८६६. उच्च दाब ग्राहक ४३५ आणि पीएम सुर्यघर योजनेतील ४२ हजार ४०२ ग्राहकाचा समावेश आहे. जिल्हा निहाय संख्या बघीतल्यास अकोल्या जिल्ह्यात १ लाख २१ हजार ११२ स्मार्ट टिओडी मीटर लागले आहे , बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ९३ हजार ४४९ आणि वाशिम जिल्ह्यात ६८ हजार १४२ मीटर लागले आहेत. तसेच दिवसा वीज वापरावर मिळालेल्या १ कोटी ९५ लाख रूपयाच्या सवलतीत अकोला जिल्हा ७० लाख ९७ हजार, बुलडाणा जिल्हा ९२ लाख ९५ हजार आणि वाशिम जिल्हा ३१ लाख ६५ हजाराचा वाटा आहे.

ग्राहकांना अचूक व वेळेत वीजबिल देण्यास उपयुक्त ठरणारे अत्याधुनिक टीओडी वीजमीटर प्री-पेड नसून, पोस्टपेड आहेत. पूर्वीप्रमाणेच वीजवापरानंतरच ग्राहकांना वीजबिले मिळणार आहेत. हे मीटर मोफत बसवण्यात येत असून, ग्राहकांना कुठलाही आर्थिक भुर्दंड बसणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. यात मानवी हस्तक्षेपाला अजिबात वाव नाही. टीओडी मीटर असल्याशिवाय घरगुती ग्राहकांना दिवसाचा वीजवापराची सवलत मिळू शकणार नाही. त्यामुळे ग्राहकांच्या दृष्टीने टीओडी मीटर आवश्यकच आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी टीओडी मीटर बसविण्याकामी महावितरण आणि संबंधित एजन्सीला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top