mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

गुटखा माफियांचे कंबरडे मोडले : The backbone of the Gutkha mafia has been broken.

शेअर करा :

The backbone of the Gutkha mafia has been broken. : गुटखा माफियांचे कंबरडे मोडले: महादेशा न्यूज पोर्टलच्या बातमीचा दणका, ठाणेदार करेवाड ॲक्शन मोडवर

The backbone of the Gutkha mafia has been broken.


अमोल साळवे :

 मलकापूर पांग्रा : बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात गुटखा विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) छेडलेल्या धडक मोहिमेमुळे अवैध गुटखा व्यवसायाची साखळी मोठ्या प्रमाणात खंडित झाली आहे. या कारवाईमुळे गुटख्याच्या व्यसनाधीन व्यक्तींना तात्पुरता त्रास होत असला तरी, अनेक घरांमध्ये मात्र समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुटख्याच्या विळख्यात अडकलेल्या कुटुंबांसाठी, विशेषतः महिलांसाठी, ही कारवाई एक मोठा दिलासा ठरली आहे.

सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा गावात सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे – ती म्हणजे “महादेशा न्यूज पोर्टल” वर प्रकाशित झालेली “गुटखा माफियावर वज्रप्रहार” ही बातमी. या बातमीचा इतका मोठा परिणाम झाला की, साखरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड यांना याची दखल घ्यावी लागली. त्यांनी तात्काळ ॲक्शन मोडवर येत, गुटखा विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

ठाणेदार गजानन करेवाड यांनी लपूनछपून गुटखा विकणाऱ्यांचे कंबरडे मोडण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या या कठोर भूमिकेमुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याचा परिणाम म्हणून, मलकापूर पांग्रा येथे सकाळपासूनच पानटपऱ्या बंद असल्याचे चित्र आहे. गुटखा न मिळाल्याने गुटखा प्रेमींची मात्र वनवन सुरू झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. या मोहिमेमुळे गुटख्याचे मोठे साठे उघडकीस आले असून, अवैध व्यापार करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गावोगावी आणि शहरांमध्ये गुटखा मिळणे कठीण झाल्याने, अनेक व्यसनाधीन व्यक्तींनी व्यसनमुक्तीच्या दिशेने पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे.

या कारवाईमुळे समाजातील अनेक स्तरांतून समाधान व्यक्त होत आहे. गुटख्यामुळे होणारे आरोग्यविषयक दुष्परिणाम आणि कुटुंबांवर होणारे आर्थिक व सामाजिक परिणाम लक्षात घेता, ही मोहीम अत्यंत आवश्यक होती. महादेशा न्यूज पोर्टलने या गंभीर विषयावर प्रकाश टाकून, प्रशासनाला कारवाई करण्यास प्रवृत्त केले, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. यापुढेही अशाच प्रकारे अवैध धंद्यांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि प्रसारमाध्यमांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top