mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

डोणगाव अप्पर तहसीलसंदर्भात नऊ अक्षेप : Nine objections regarding Dongaon Upper Tehsil

शेअर करा :
Nine objections regarding Dongaon Upper Tehsil :  डोणगाव अप्पर तहसीलसंदर्भात नऊ अक्षेप
डोणगावपेक्षा मेहकर जवळ, डोणगावला दळणवळण व्यवस्था नसल्याच्या तक्रारी
Nine objections regarding Dongaon Upper Tehsil


डोणगाव, दि. ९ (प्रतनिधी)

मेहकर तहसीलमध्ये विविध कामांसाठी जाणाऱ्या जनतेला मेहकर अंतरावर पडते. शासन दरबारी डोणगाव अपर तहसीलचा प्रस्ताव सादर करण्यात आल. ज्यामध्ये चार महसूल मंडळे येणार होती. त्यात डोणगाव, अंजनी बुद्रूक, लोणी गवळी व शिरगाव देशमुख या मंडळांचा कारभार डोणगाव येथून चालणार होता. यात अपर तहसील होण्याअगोदर या चार मंडळामधील जनतेचे अक्षेप बोलवण्यात आले होते. त्यात नऊ अक्षेप आले  असून हे अक्षेप आयुक्तांमार्फत शासनापर्यंत पोहोचणार आहेत. त्यानंतर अंतरिम निर्णय शासन घेणार आहे.

डोणगाव अपर तहसीलची प्रक्रिया सुरू असून यामध्ये चार मंडळाचा समावेश होणार होता. डोणगाव, अंजनी बुद्रुक, लोणी गवळी व शेलगाव देशमुख यापैकी अंजनी बुद्रूक मंडळामधून सहा अक्षेप नोंदवल्या गेले. त्यात सांगण्यात आले की डोणगाव हे या मंडळापासून सोनाटी, उकळी, परतापूर हे गाव २० ते २५ किलोमीटर अंतरावर आहे. तर पूर्वीचे तहसील मेहकर येथून पाच ते सात किमी अंतरावर ही गावे येतात. आमचे गाव, आमचे मंडळ हे मेहकर तहसीलअंतर्गतच यायला हवे तर तीन अक्षेप हे लोणी गवळी मंडळामधून दाखल करण्यात आले. यामध्ये सांगण्यात आली की डोणगाव अपर तहसील झाल्यानंतर या ठिकाणी जनतेला जावे लागेल. मात्र डोणगावपासून आमच्या गावाला जाण्या येण्यासाठी ज्या दळणवळण सुविधा पाहिजे. त्या नसल्याकारणाने आम्ही डोणगावला जायचे यायचे कसे? आमचे गाव व आमचे मंडळ मेहकर तहसीलअंतर्गत राहू द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्राप्त अक्षेप हे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अमरावती आयुक्तांकडे जाणार व तेथून शासनापर्यंत पोहोचतील. शासन यावर अंतरिम निर्णय घेऊन चार मंडळांपैकी किती मंडळ डोणगाव अपर तहसीलला जोडण्यात यावे, हा अंतिम निर्णय घेण्यात येईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top