mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

जनसेवा सप्ताहात समाजहिताचे उपक्रम : Social welfare initiatives during Public Service Week

शेअर करा :

Social welfare initiatives during Public Service Week : उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहाअंतर्गत दुसरबीड येथील प्रो. जावेदखान उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे वृक्षारोपण व शिबिर घेण्यात आले.


Social welfare initiatives during Public Service Week
रक्तदान करताना विद्यार्थी व शिक्षकवृंद

प्रो. जावेदखान हायस्कूलमध्ये वृक्षारोपण व रक्तदान शिबिर 

दुसरबीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहाअंतर्गत दुसरबीड येथील प्रो. जावेदखान उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे वृक्षारोपण व शिबिर घेण्यात आले. सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि मानवसेवेचा संदेश देणारा हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. नाझेर काझी होते. प्रमुख उपस्थितीत पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इरफानअली शेख, तालुकाध्यक्ष सिद्धार्थ जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष शंतनु बोंद्रे, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष श्याम जाधव, महिला जिल्हाध्यक्ष तथा माजी सभापती पूनम राठोड, नगरसेवक उमेश खरात यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यावेळी प्राचार्य सादिक शेख, अबरार शेख वाहेद, शेख आबेद शेख खालेद, कचरूजी भारस्कर, शेख जाकेर, जुनेद अली, सागर सांगळे, जाकेर शेख, शब्बीर शेख, नासेर शेख, रहेमान शेख, मुदस्सर अली, तलत अली, अक्षय सांगळे, संतोष दराडे, अफसर अली, शेख राजू उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, रक्तदाते, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांचे आयोजकांनी आभार मानले. “रक्तदान हे जीवनदान आणि वृक्षारोपण ही भावी पिढ्यांसाठीची अमूल्य गुंतवणूक आहे,” असा संदेश मान्यवरांनी यावेळी दिला.

६७ दात्यांचे रक्तदान

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ६७ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली. त्याचबरोबर परिसरात ६७ विविध वृक्षांची लागवड करून पर्यावरण संरक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. जनसेवा सप्ताहातील या उपक्रमामुळे सेवा, संवेदना आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top