mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

बँक व्यवस्थापकास मारझोड : Bank manager beaten up 

शेअर करा :

Bank manager beaten up : खामगाव : शेतकऱ्याला ‘बॅंक तुमच्या बापाची आहे काय?’ म्हणत उद्धट वागणूक दिल्याचा जाब विचारत असतानाच संतापलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी सेंट्रल बॅंकेच्या व्यवस्थापकाला कार्यालयात मारहाण केली. या मारझोडीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.


Bank manager beaten up
मारहाण करताना

Bank manager beaten up

‘स्वाभिमानी’च्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल : खामगाव येथील सेंट्रल बॅंकेतील घटनेचा व्हिडीओ व्हायरल

खामगाव : शेतकऱ्याला ‘बॅंक तुमच्या बापाची आहे काय?’ म्हणत उद्धट वागणूक दिल्याचा जाब विचारत असतानाच संतापलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी सेंट्रल बॅंकेच्या व्यवस्थापकाला कार्यालयात मारहाण केली. या मारझोडीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. खामगावात ३० जुलैच्या दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या खामगाव शाखेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील व कार्यकर्त्यांनी ३० जुलैच्या दुपारी दोन-अडीचच्या सुमारास धडक दिली. कर्जमाफीच्या मुद्यावरून शाखा व्यवस्थापक शिवाजी कड व पाटील यांच्यात वाद झाला. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या उद्धट वागणुकीबद्दल जाब विचारत अमोल पाटील यांनी कड यांच्या कानशिलात दोन चापटा लगावल्या. तर मध्यस्थी करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या श्रीमुखातही एक चापट पाटील यांनी भडकावत संताप व्यक्त केला. काही जणांनी मध्यस्थी करीत पाटील यांना बॅंकेबाहेर नेले.

व्यवस्थापक शिवाजी तुकाराम कड (वय ४०) रा. कड पिंपळगाव, ता. जाफराबाद, जि. जालना ह.मु स्वामी समर्थ केंद्र डिपी रोड, खामगाव यांच्या तक्रारीवरून अमोल विश्वासराव टिकार (पाटील) रा. बोरी अडगाव, ता. खामगाव यांच्याविरुद्ध खामगाव शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १३२, ११५ (२), ३५१(२), ३५२ नुसार गुन्हे दाखल केले.

काय म्हटले तक्रारीत

शिवाजी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मी शाखा प्रबंधक कक्षात बसून कामकाज करीत असताना अमोल पाटील यांनी येऊन माझ्या वडिलांचे खाते कर्जमाफी यादीमध्ये का आले नाही, त्याबाबत लेखी द्या. तेव्हा समजावून सांगितले की, कर्जमाफी यादी ही शासनाकडून येते, तरी आपल्याला काही अडचण असल्यास बँकेचे अॅग्रीकल्चर ऑफिसर यांना भेटा. माझी व्हिसीव्दारे मीटिंग सुरू आहे, असे सांगितले असता पाटील यांनी शिवीगाळ करत कक्षात आले. तेव्हा त्यांना विचारले तुमचे काम झाले नाही का, ए.एफ.ओ यांना भेटले नाही का, असे विचारले असता मारहाण केली. योगेश विजय भुतेकर यांनाही शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. पुढील तपास एपीआय गोंडाणे करीत आहेत.

….

‘बॅंकेत कर्जमाफीची विचारणा करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला बॅंक व्यवस्थापक शिवाजी कड यांनी ‘तुमच्या बापाची बॅंक आहे का?, तुम्हाला कितीवेळेस कर्ज सवलत द्यायची, असे बोलल्याने त्यांना चोप दिला. आता भाषा सुधारली नाही तर स्वाभिमानी स्टाइलने चोप दिला जाईल.’

अमोल पाटील,

जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top