Another ideal example of Ruikhede Mayamba Gram Panchayat : रुईखेड मायंबा (मोहोज) या आदर्श गावाने पुन्हा एकदा शासनाच्या पटलावर आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवला. स्वच्छ ग्राम विशेष पुरस्काराने ग्रामपंचायतीला प्रजासत्ताकदिनी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

स्वच्छ ग्राम विशेष पुरस्काराने सन्मानित
धाड : बुलढाणा तालुक्यातील रुईखेड मायंबा (मोहोज) या आदर्श गावाने पुन्हा एकदा शासनाच्या पटलावर आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवला. स्वच्छ ग्राम विशेष पुरस्काराने ग्रामपंचायतीला प्रजासत्ताकदिनी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०२५-२६ पुरस्कार स्पर्धेमध्ये रुईखेड मायंबा ग्रामपंचायतीने जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेअंतर्गत स्व. आबासाहेब खेडकर (शौचालय व्यवस्थापन) विशेष पुरस्कार रुईखेड मायंबा ग्रापंचायतीने पटकाविला. २६ जानेवारी २०२६ रोजी गणराज्यदिनी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात आणि आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार सरपंच सुरेखाताई अनिल फेपाळे, ग्रामपंचायत अधिकारी संजय फकीरा इंगळे यांनी स्वीकारला. यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल फेपाळे उपस्थित होते.

