Various programs in Buldhana on the occasion of Guru Ravidas Jayanti : समता वादाचे समर्थक, संत मीराबाई यांचे गुरु रविदास महाराज यांची ६५० वी जयंती बुलढाणा शहरात १ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांनी पार पडणार आहे.

बुलढाणा : समता वादाचे समर्थक, संत मीराबाई यांचे गुरु रविदास महाराज यांची ६५० वी जयंती बुलढाणा शहरात १ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांनी पार पडणार आहे.
धाड नाका येथे सकाळी नऊ वाजता गुरु रोहिदास यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोटारसायकल रॅलीस प्रारंभ होणार आहे. त्यानंतर संगम चौकातील गुरु रोहिदास यांच्या पुतळ्याला पुष्पहार करून अभिवादन करण्यात येईल. तानाजीनगर येथील गुरु रविदास सामाजिक भावनात रविदास जयंतीचा मुख्य सोहळा नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळी चर्मकार समाजातील प्रतिभावंतांसह नवनिर्वाचित नगराध्यक्ष पूजा ताई गायकवाड व नगरसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे. सायंकाळी सात वाजता गांधी भवन येथे शाहीर मेघानंद जाधव यांचा परिवर्तनवादी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजय गायकवाड हे करतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादासाहेब काटकर उपस्थित राहणार आहेत.
या सर्व कार्यक्रमाला रविदास अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

