mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

डोमरूळ जि.प. मराठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रदीप शेनफड धंदर : Pradip Shenfad Dhandar appointed as Chairman of the Domrul Z.P. Marathi School Management Committee.

शेअर करा :

Pradip Shenfad Dhandar appointed as Chairman of the Domrul Z.P. Marathi School Management Committee. : डोमरूळ जि.प. मराठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रदीप शेनफड धंदर; उपाध्यक्षपदी समाधान इंगळे

Pradip Shenfad Dhandar appointed as Chairman of the Domrul Z.P. Marathi School Management Committee.


पालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत निवड; शाळेच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार

 

कडूबा पाडळे
डोमरूळ प्रतिनिधी दि. ८ : डोमरूळ येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रदीप शेनफड धंदर, तर उपाध्यक्षपदी समाधान रामचंद्र इंगळे यांची निवड करण्यात आली. पालक, ग्रामस्थ आणि शिक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या निवड प्रक्रियेत दोन्ही पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

शाळेच्या शैक्षणिक व भौतिक विकासाला चालना देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका महत्त्वाची असते. त्याच पार्श्वभूमीवर झालेल्या या निवडीकडे पालक व ग्रामस्थांचे लक्ष लागले होते. अध्यक्षपदी प्रदीप शेनफड धंदर आणि उपाध्यक्षपदी समाधान रामचंद्र इंगळे यांची निवड झाल्यानंतर उपस्थितांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

यावेळी माजी ग्रामपंचायत सरपंच अनिल सखाराम पवार, मागील ग्रामपंचायत सदस्य रवी जाधव, शाळा समिती सदस्य मोहन धंदर यांच्यासह ग्रामपंचायत शिपाई व पालक वर्गाचे प्रतिनिधी गजू भाऊ हराळ, वाटरमन शिपाई व पालक वर्गाचे प्रतिनिधी विलास धंदर, पालक प्रतिनिधी सुरेश राजाराम धंदर तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

शाळेतील शिक्षक वर्गातून श्री. चव्हाण सर, श्री. जोशी सर, श्री. झोमाळकर सर व श्री. चव्हाण सर यांची उपस्थिती होती. शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

नवीन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, शाळेतील आवश्यक सुविधा, स्वच्छता, शैक्षणिक वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपक्रम राबविण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. शाळेच्या प्रगतीसाठी शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीने एकत्रितपणे काम करण्याची गरज यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/

नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीप शेनफड धंदर व उपाध्यक्ष समाधान रामचंद्र इंगळे यांचे गावकऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या निवडीमुळे डोमरूळ जिल्हा परिषद शाळेच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top