mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

माळविहीरच्या मातीवर कचऱ्याचे साम्राज्य नकोच : We do not want a reign of trash on the soil of Malvihir.

शेअर करा :

We do not want a reign of trash on the soil of Malvihir. : माळविहीरच्या मातीवर कचऱ्याचे साम्राज्य नकोच; राष्ट्रमाता जिजाऊंच्या स्मारकासाठी नागरिकांचा एल्गार!

We do not want a reign of trash on the soil of Malvihir.


बुलढाणा प्रतिनिधी :  शहरालगतच्या माळविहीर परिसरामध्ये प्रशासनाकडून लादण्यात येणाऱ्या प्रस्तावित कचरा डेपो प्रकल्पाविरोधात आता नागरिकांचा संयम संपला असून तीव्र संताप उसळला आहे. या अन्यायकारक प्रकल्पाचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आज सुंदरखेड येथील हनुमान मंदिराच्या परिसरामध्ये नागरिकांनी एकत्र येत कचरा डेपोरूपी रावणाचे प्रतीकात्मक दहन केले. या ज्वलंत आंदोलनामुळे संपूर्ण परिसरात प्रशासनाच्या विरोधात एकच रोष व्यक्त होत आहे.

We do not want a reign of trash on the soil of Malvihir.

सावळा, सुंदरखेड, माळविहीर, भादोला आणि पोखरी परिसरातील सर्व जाती आणि धर्मांचे नागरिक, माता-भगिनी, तरुण, लहान बाळे तसेच ज्येष्ठ नागरिक या संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरले होते. कचरा डेपो कायमस्वरूपी रद्द करा, आमच्या मुलांना शिक्षणासाठी शाळा हवी, परिसरात दुर्गंधी नको तर विकास हवा, आणि माळविहीरच्या जागेवर राष्ट्रमाता जिजाऊंचे भव्य स्मारक उभे राहिलेच पाहिजे, अशा बुलंद घोषणा देत उपस्थितांनी संपूर्ण परिसर दणदणून सोडला.

We do not want a reign of trash on the soil of Malvihir.

ज्या बुलढाणा जिल्ह्याला छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊंचा पवित्र आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे, त्याच भूमीवर कचऱ्याचे डोंगर उभे करणे म्हणजे या महान वारशाचा अवमान आहे. प्रशासनाने हा काळा डाग आपल्या माथ्यावर घेण्याऐवजी संबंधित जागेवर राष्ट्रमाता जिजाऊंचे भव्य प्रेरणास्थळ, अभ्यासिका, ग्रंथालय, सांस्कृतिक केंद्र आणि सार्वजनिक उद्यान उभारावे, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. या परिसराची ओळख कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी नव्हे, तर जिजाऊंच्या विचारांच्या अभिमानाने झाली पाहिजे, असा इशारा नागरिकांनी दिला.

वाढत्या नागरी वस्तीच्या या भागात कचरा डेपोमुळे निर्माण होणारी दुर्गंधी, हवेचे व पाण्याचे प्रदूषण आणि त्यामुळे आरोग्याला होणारा धोका आम्हाला मान्य नाही. आमच्या मुलांच्या हातात ज्ञानाची पुस्तके हवीत, कचऱ्याचे ढीग नकोत. यापूर्वी प्रशासनाकडे चार वेळा शांततापूर्ण मार्गाने निवेदने देऊनही आणि मोर्चा काढून विरोध दर्शवूनही केवळ सात दिवसांत अहवाल देण्याचे आश्वासन हवेतच विरले आहे. प्रशासनाने आता आमच्या सहनशक्तीची परीक्षा पाहू नये, केवळ पोकळ आश्वासने नकोत तर प्रकल्प रद्द केल्याचा लेखी आदेश हवा, अशी संतप्त भूमिका ग्रामस्थांनी मांडली.

हा लढा कोणत्याही एका जातीचा किंवा धर्माचा नसून संपूर्ण मानवतेचा आणि भविष्याचा आहे. जर प्रशासनाने तातडीने हा विनाशकारी प्रकल्प रद्द केला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि प्रसंगी सामूहिक आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलण्यात येईल, असा अत्यंत गंभीर इशारा या वेळी देण्यात आला. प्रशासनाने वेळेοच यावर कठोर निर्णय घ्यावा, अन्यथा होणाऱ्या परिणामांची जबाबदारी प्रशासनाचीच असेल, असा इशारा सावळा-सुंदरखेड-माळविहीर परिसर कचरा डेपो विरोधी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top