Grand Felicitation Ceremony and Yuva Sena Resolve Convention Concluded : भव्य सन्मान सोहळा आणि युवासेना संकल्प मेळावा संपन्न

चिखली प्रतिनिधी : चिखली येथे आज शिवसेना जिल्हाप्रमुख तथा बुलढाणा बाजार समितीचे लोकप्रिय सभापती आदरणीय मा. श्री. जालिंधरभाऊ बुधवत यांची जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा अत्यंत उत्साहात सत्कार करण्यात आला. भाऊंच्या या ऐतिहासिक विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आणि शिवसेना-युवासेनेची ताकद आणखी बुलंद करण्यासाठी चिखली नगरीत ‘भव्य सन्मान सोहळा’ व ‘चिखली युवासेना – शिवसेना संकल्प मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक युवासेना जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कऱ्हाडे हे होते.

या भव्य मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना उपनेते मा. आ. श्री. नितीनबापू देशमुख यांनी उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संपर्कप्रमुख श्री. नरेंद्रजी खेडेकर लाभले होते. तसेच, प्रमुख पाहुणे म्हणून मा. आ. श्री. सिद्धार्थजी खरात आणि विशेष उपस्थिती म्हणून शिवसेना पक्ष प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, श्री. चिखली संपर्कप्रमुख संजयजी राठोड, सहसंपर्क प्रमुख डी. एस. लहाने सर, जिल्हा समन्वयक गजानन धांडे, ऍड. सुमित सरदार यांची सन्माननीय उपस्थिती लाभली.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जालिंधरभाऊ बुधवत यांना महापुरुषांची प्रतिमा भेट देऊन चिखलीवासीयांच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. हा सोहळा म्हणजे चिखली मतदारसंघातील शिवसेना आणि युवासेनेच्या अखंड ताकदीचे आणि एकजुटीचे जिवंत उदाहरण ठरले. भाऊ, आपली ही नवीन इनिंग सहकार क्षेत्रात शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या हक्काची नवी पहाट घेऊन येईल, हा आम्हा सर्व शिवसैनिकांना ठाम विश्वास आहे. आपल्या पुढील यशस्वी कारकिर्दीस अनंत शुभेच्छा.

या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख विलास सुरडकर, तालुकाप्रमुख किसनराव धोंडगे, सिद्धेश्वर आंधळे, दादाराव खार्डे, आत्माराम शेळके, निंबाजी पांडव, नगराध्यक्ष किशोर गारोळे तसेच शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे शहर प्रमुख, उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.


