mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

सरकार हमसे डरती है, पोलीस को आगे करती है : The government is afraid of us; it uses the police as a shield.

शेअर करा :

The government is afraid of us; it uses the police as a shield. : सरकार हमसे डरती है, पोलीस को आगे करती है! वनोजा फाट्यावर शेतकऱ्यांचा एल्गार, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

The government is afraid of us; it uses the police as a shield.


वाशिम/वनोजा, दि. ३०  : शेतकऱ्यांच्या न्याय आणि हक्कासाठी पुन्हा एकदा संघर्षाचा एल्गार पुकारण्यात आला. शिवसेना उपनेते मा. नितीन बाप्पू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज ३० ऑक्टोबर रोजी वनोजा, जिल्हा वाशिम येथे समृद्धी महामार्ग रोखो आंदोलन पुकारण्यात आले होते.

शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी पोलिसी दडपशाही

शेतकऱ्यांचा बुलंद आवाज दाबण्यासाठी वनोजा फाटा, वाशिम येथे पोलिसांनी दडपशाही करत शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकार हमसे डरती है, पोलीस को आगे करती है अशा जोरदार घोषणा दिल्या.

अटक करू शकाल, पण शेतकऱ्यांचा संताप कसा विझवणार 

सरकारने एक गोष्ट लक्षात ठेवावी, अटक करू शकाल पण शेतकऱ्यांच्या रक्तात पेटलेला संतापाचा ज्वाळ कसा विझवणार? ही दडपशाही हुकूमशाहीची लक्षणे असून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही. जालिंदर बुधवत यांना डिटेन केले म्हणून सरकार आमचा संघर्ष थांबवू शकत नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा अधिक तीव्र होणार, असा इशारा यावेळी देण्यात आला.

The government is afraid of us; it uses the police as a shield.

आंदोलनात दिग्गजांची उपस्थिती

या रस्ता रोको आंदोलनाला शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, शिवसेना पक्षप्रवक्त्या जयश्रीताई शेळके, जिल्हा समन्वयक गजानन धांडे, उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, तालुकाप्रमुख विजय इतवारे, विजय राऊत, सुनील भाग्यवंत तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top