mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ९१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना निधी वितरीत : Funds distributed to over 9.1 million farmers in Maharashtra by Prime Minister Narendra Modi

शेअर करा :

Funds distributed to over 9.1 million farmers in Maharashtra by Prime Minister Narendra Modi : शेतकरी समृद्धीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानावर भर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ९१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना निधी वितरीत

Funds distributed to over 9.1 million farmers in Maharashtra by Prime Minister Narendra Modi


मुंबई, दि. ३०: देशातील शेतकरी वर्गाचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार आर्थिक मदतीसोबतच विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन आणि पशुसंवर्धनाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत २४ व्या हप्त्याचे वितरण गुजरातधील बनासकांठा येथ आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी पंतप्रधानांनी एका क्लिकद्वारे महाराष्ट्रातील ९१ लाख १२ हजार ७६५ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट १ हजार ८३५ कोटी रुपयांचा निधी जमा केला.

Funds distributed to over 9.1 million farmers in Maharashtra by Prime Minister Narendra Modi

मुंबईतील शासकीय निवासस्थानावरून या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) सहभाग घेतला, तर याप्रसंगी कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सरकारच्या विविध धोरणांमुळे गेल्या काही वर्षांत देशातील अन्नदात्यांना ५० लाख कोटी रुपयांहून अधिकचा आर्थिक लाभ झाला असून त्यांच्या शेतीखर्चात मोठी बचत झाली आहे. देशातील ८५ टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून आजवर सुमारे ४ लाख कोटी रुपये थेट डीबीटीद्वारे हस्तांतरित करण्यात आले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती प्रचंड वाढल्या असतानाही त्याचा बोजा केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर पडू दिला नाही. शेतकऱ्यांना स्वस्त दरात खते मिळवून देण्यासाठी सरकारने तब्बल १६ लाख कोटी रुपयांची उधळण केली आहे. गेल्या बारा वर्षांत गहू व धान उत्पादकांना किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) माध्यमातून २४ लाख कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले असून, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत गेल्या दशकात २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

शेतीचा सिंचन खर्च आटोक्यात आणण्यासाठी ‘पीएम कुसुम’ योजना गेम चेंजर ठरत आहे. या योजनेद्वारे आतापर्यंत देशात सुमारे १२ लाख सौरपंप बसवण्यात आले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांची ८० कोटी लिटरहून अधिक डिझेलची बचत झाली असून अतिरिक्त विजेच्या उत्पादनाचाही मोठा आर्थिक लाभ त्यांना मिळत आहे.

हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या सुमारे तीन हजार नव्या जातींची बियाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पशुसंवर्धनाला बळकटी देण्यासाठी ‘राष्ट्रीय गोकुळ अभियाना’च्या माध्यमातून देशी जनावरांचे संवर्धन केले जात आहे. जनावरांना लाळ्या-खुरकुत रोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी देशात व्यापक मोफत लसीकरण मोहीम राबवली गेली असून १५० कोटींहून अधिक लसमात्रांद्वारे ८ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे पशुधन संरक्षित करण्यात आले आहे. या सर्व वैज्ञानिक उपायांमुळे देशातील गाय आणि म्हशींचे प्रतिदिन सरासरी दूध उत्पादन २०१३-१४ मधील पाच लिटरपेक्षा कमीवरून थेट आठ लिटरवर पोहोचल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

दरम्यान, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी देशभरात होणाऱ्या ‘रन फॉर युनिटी’ (एकतेसाठी धाव) मध्ये तरुण व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top