mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळाचे सावट : The shadow of drought looms over Buldhana district

शेअर करा :

The shadow of drought looms over Buldhana district : बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळाचे सावट! १४२० गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी, सरासरी केवळ ४२ पैसे

The shadow of drought looms over Buldhana district


बुलढाणा, दि. ३०: खरीप हंगाम २०२६-२७ साठी बुलढाणा जिल्ह्याची सुधारित पैसेवारी अखेर जाहीर झाली असून जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील एकूण १ हजार ४२० गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. विशेष म्हणजे ५० पैशांपेक्षा जास्त पैसेवारी असलेले एकही गाव जिल्ह्यात नाही. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी केवळ ४२ पैसे इतकी आहे.

१३ तालुक्यातील सर्व गावांचा समावेश

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, या १४२० गावांमध्ये बुलढाणा तालुक्यातील ९८, चिखली १४४, देऊळगाव राजा ६४, मेहकर १६१, लोणार ९१, सिंदखेड राजा ११४, मलकापूर ७३, मोताळा १२०, नांदुरा ११२, खामगाव १४६, शेगाव ७३, जळगाव जामोद ११९ आणि संग्रामपूर तालुक्यातील १०५ गावांचा समावेश आहे.

तालुकानिहाय सरासरी पैसेवारी

तालुकानिहाय सरासरी पैसेवारीमध्ये बुलढाणा ३१ पैसे, नांदुरा ३८ पैसे, चिखली ४० पैसे, खामगाव ४१ पैसे, देऊळगाव राजा ४२ पैसे, सिंदखेड राजा ४२ पैसे, जळगाव जामोद ४३ पैसे, मेहकर ४५ पैसे, तर लोणार ४६, मलकापूर ४६, मोताळा ४६, शेगाव ४६ आणि संग्रामपूर ४६ पैसे अशी सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top