Political developments gain momentum in Amravati; Eknath Korde makes a high-profile entry into the Congress party. : अमरावतीत राजकीय घडामोडींना वेग, एकनाथ कोरडे यांचा काँग्रेस पक्षात जोरदार प्रवेश

बुलढाणा प्रतिनिधी दि १८ : अमरावती येथे नुकतीच पार पडलेली महाराष्ट्र काँग्रेसची विभागीय आढावा बैठक आगामी राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. या बैठकीत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणारी एक महत्त्वाची घडामोड घडली असून, रायपूर येथील शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. एकनाथ महादू कोरडे यांनी अधिकृतपणे काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे अमरावती विभागातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला जी. प्रसाद आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. बैठकीदरम्यान झालेल्या सत्कार सोहळ्यात श्री. एकनाथ महादू कोरडे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर आणि धोरणांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. चिखली विधानसभेचे मा. आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वात त्यांनी काँग्रेस पक्षात आपले पाऊल ठेवले. उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने झालेल्या या पक्षप्रवेशामुळे स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद अधिक वाढेल, असा ठाम विश्वास यावेळी नेत्यांनी व्यक्त केला.
एकनाथ कोरडे यांच्या पक्षप्रवेशाच्या या महत्त्वपूर्ण प्रसंगी काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेते व पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर, खासदार बळवंतराव वानखडे, माजी मंत्री सुनीलभाऊ देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, ॲड. संदिप पाटील, मिलिंद चिमोटे, अभिजित सपकाळ, बबलूभाऊ देशमुख, बबलू शेखावत, प्रकाश तायडे, प्रकाश पाटील, राजूभाऊ चौधरी, रिजवान सौदागर, डॉ. अरविंद कोलते, महेंद्र गवई, ॲड. अनंतराव वानखडे, चित्रांगण खंडारे, धनंजय देशमुख आणि राजू वाघ यांच्यासह विविध आघाड्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
श्री. एकनाथ कोरडे यांच्यासारख्या शिक्षण क्षेत्रातील आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या कर्तबगार व्यक्तीच्या आगमनाने काँग्रेस पक्षाची तळागाळातील संघटनात्मक बांधणी अधिक बळकट होईल, असा विश्वास याप्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश काँग्रेस पक्षासाठी अत्यंत लाभदायक ठरेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


