mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

समृद्धीवर आणखी एक बळी : Another victim of prosperity

शेअर करा :

Another victim of prosperity : भरधाव वेगातील ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने समोरील अज्ञात वाहनाला धडक बसली. यात ट्रकमधील एकाचा मृत्यू झाला.

Another victim of prosperity

मेहकर : भरधाव वेगातील ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने समोरील अज्ञात वाहनाला धडक बसली. यात ट्रकमधील एकाचा मृत्यू झाला.
समृद्धी महामार्गावरील नागपूर लेनमध्ये चॅनल क्रमांक २६९ जवळ भारत पेट्रोल पंपासमोर ४ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
सुखदेव बारसकर असे ठार झालेल्याचे नाव आहे. मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील ऐनखेडचा बारसकर तसेच कालवा गावचा जनकलाल शामराव चिलाटे (वय २८) आणि ट्रकचालक नारायण रावसाहेब ठेंग (रा. खंडाळा, मकरध्वज, ता. चिखली, जि. बुलढाणा) हे एमएच-२८-बीबी-५४४४ क्रमांकाच्या ट्रकने कारंजा लाडकडे निघाले होते. चालकाने ट्रक भरधाव वेगाने चालवून समोरील अज्ञात वाहनाला धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात सुखदेव बारसकर यांचा जागीच मृत्यू झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top