mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी कॅनमध्ये डिझेल देण्याची परवानगी द्या Allow farmers to purchase diesel in cans for their tractors.

शेअर करा :

Allow farmers to purchase diesel in cans for their tractors. : शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी कॅनमध्ये डिझेल देण्याची परवानगी द्या

Allow farmers to purchase diesel in cans for their tractors.
शैलेश सावजी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

बुलढाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरमध्ये कॅनद्वारे डिझेल मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ योग्य आदेश काढावेत, अशी मागणी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शैलेश सपना सुभोधभाऊ सावजी यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवेरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

सध्या पावसाळ्याच्या तोंडावर जिल्ह्यातील शेतकरी शेती मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. नांगरणी, वखरणी, पेरणीपूर्व मशागत यांसारखी अनेक कामे ट्रॅक्टरशिवाय होऊ शकत नाहीत. मात्र अनेक पेट्रोल पंप चालक ट्रॅक्टर प्रत्यक्ष पंपावर आणल्याशिवाय कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार देत असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. ग्रामीण भागात अनेक वेळा ट्रॅक्टर शेतातच उभे असतात किंवा तांत्रिक कारणांमुळे पंपावर नेणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मोठा मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.

निवेदनात शैलेश सावजी यांनी नमूद केले आहे की, ट्रॅक्टर हे पूर्णतः शेतीसाठी वापरले जाणारे वाहन असून शासनाने त्याला रोड टॅक्समधूनही सूट दिलेली आहे. त्यामुळे शेतीकामासाठी लागणारे इंधन शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होणे आवश्यक आहे. मात्र विद्यमान परिस्थितीत डिझेल मिळण्यात होणाऱ्या अडचणींमुळे शेतकऱ्यांचे शेतीचे नियोजन विस्कळीत होत असून वेळेवर मशागत न झाल्यास उत्पादनावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तसेच अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांनी ट्रॅक्टरच्या माध्यमातून उदरनिर्वाहाचे साधन निर्माण केले असून ट्रॅक्टर भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. परंतु डिझेल उपलब्ध न झाल्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. शेतीच्या हंगामातच अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

यावर उपाय म्हणून ट्रॅक्टरची आर.सी. बुक अथवा संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्याबाबत जिल्हा प्रशासनाने स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पेट्रोल पंप चालकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे आणि शेतीच्या कामात अडथळे निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

शेतकरी आधीच नैसर्गिक संकटे, वाढते उत्पादन खर्च आणि आर्थिक अडचणींचा सामना करत असताना डिझेलसारख्या मूलभूत गरजेसाठी त्यांना त्रास सहन करावा लागू नये, अशी भावना व्यक्त करत प्रशासनाने या विषयात तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शैलेश सावजी यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top