Congress faces a lot of trouble in Motala : काँग्रेसमध्ये घुसमट होत असल्याने असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला.

विकासाचा झेंडा हाती घेत कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश : आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास
मोताळा : तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून असंख्य पदाधिकाऱ्यांसोबत कार्यकर्त्यांनी शिवसेनेची वाट धरली आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला.
बुलढाणा शहरातील शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय येथे ३० जानेवारी रोजी हा प्रवेश सोहळा झाला. आमदार गायकवाड यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार केला.
आमदार गायकवाड यांच्या विकासात्मक, लोकाभिमुख व कर्तव्यदक्ष नेतृत्वाला प्रेरित होऊन शाहरुख बाबा, तनवीर बाबा, सोफियान बाबा, फैजान बाबा, मोशीन बाबा, शहेबाज बाबा, सोहिल बाबा, रेहान बाबा, नय्युम बाबा, फयुम बाबा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा विकासाचा झेंडा हाती घेतला.
शिवसेना ही सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी लढणारी संघटना असून विकास, सेवा आणि जनतेशी थेट नाळ जोडून काम करणारा पक्ष असल्याचे आमदार गायकवाड यांनी सांगितले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष गजेंद्र दांदडे, मोईन काझी, सुनील उदयकार, उपशहरप्रमुख विजय कोल्हे, नगरसेवक उदय देशपांडे, गोविंदा खुमकर, शेख बाबा, शेख जावेद, अशरफ भय्या, प्रकाश पांडे, सचिन हिरोळे, रणजीत राजपूत यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पक्षप्रवेशामुळे मोताळा तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली असून आगामी काळात शिवसेनेच्या कार्याला नवे बळ मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

