mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

रेल्वे स्टेशनजवळ उष्माघाताने एकाचा मृत्यू : Death of one due to heat stroke

शेअर करा :

Death of one due to heat stroke? : मलकापूर रेल्वे स्टेशन परिसरात ३० एप्रिलला एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.


बुलढाणा : मलकापूर रेल्वे स्टेशन परिसरात ३० एप्रिलला एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्टेशनजवळील ऑटो स्टॅंड परिसरात ३० एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास ५० वर्षीय व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडलेली असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने संबंधित व्यक्तीस उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यास मृत घोषित केले. प्राथमिक तपासात संबंधित व्यक्तीचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

रंग सावळा, उंची अंदाजे ५ फूट ४ इंच, अंगात अर्ध्या बाह्यांचा बदामी रंगाचा व त्यावर पांढरे पट्टे असलेला टी-शर्ट, राखाडी रंगाची नाईट पँट व आत हाफ बरमोडा परिधान केलेला आहे. डोक्यावर काळे-पांढरे लांब केस, वाढलेली काळी-पांढरी दाढी तसेच चेहरा गोलाकार आहे, असे मृताचे वर्णन आहे. या व्यक्तीबाबत ओळख पटविण्याचे आवाहन सहायक फौजदार संजय निंबोळकर यांनी केले आहे

.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top