mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराची सखोल चौकशीची मागणी : Demand for a thorough inquiry into the officer’s arbitrary conduct.

शेअर करा :

Demand for a thorough inquiry into the officer’s arbitrary conduct. : सिंदखेडराजा भूमी अभिलेख कार्यालयातील ‘त्या’ अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराची सखोल चौकशीची मागणी; शेतकऱ्यांचा एल्गार

Demand for a thorough inquiry into the officer's arbitrary conduct.


अमोल साळवे 
मलकापूर पांगरा: शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या संघटनांनी आता सिंदखेडराजा भूमी अभिलेख कार्यालयातील एका अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराविरोधात दंड थोपटले आहेत. ‘सहाय्यक मुख्यालय’ पदावर कार्यरत असलेले मारोती थोरवे यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्यांच्या निलंबनाची मागणी जोर धरू लागली आहे. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे सचिन खंडारे आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे देविदास सरकटे यांनी १८ जून रोजी जिल्हा भूमी अधीक्षक, बुलढाणा यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जाद्वारे ही मागणी केली आहे.

तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार, मारोती थोरवे हे कार्यालयात येणाऱ्या शेतकऱ्यांशी अत्यंत उद्धटपणे वागतात. त्यांच्यावर केवळ लालसेपोटी शेतकऱ्यांची कामे जाणूनबुजून अडवल्याचा गंभीर आरोप आहे. अनेक शेतकऱ्यांची प्रकरणे त्यांनी अडवून ठेवली असून, काही प्रकरणे मात्र पंधरा दिवसांतच निकाली काढल्याचेही निदर्शनास आले आहे. या दुहेरी भूमिकेमुळे त्यांच्या कार्यकाळात झालेल्या मोजणी प्रकरणांमध्ये मोठे गौडबंगाल असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आर्थिक देवाणघेवाण झाल्याची शक्यताही वर्तवली जात असून, खातेनिहाय चौकशीतूनच हे सत्य समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पत्रकार सचिन खंडारे आणि शेतकरी नेते देविदास सरकटे यांनी जिल्हा भूमी अधीक्षकांकडे मागणी केली आहे की, थोरवे रुजू झाल्यापासून त्यांनी केलेल्या सर्व मोजणी प्रकरणांची सखोल तपासणी करावी. त्यांच्या खात्याची जिल्हास्तरीय तीन सदस्यीय समितीमार्फत चौकशी करून, दोषी आढळल्यास तात्काळ निलंबनाची कारवाई करावी.

या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास, जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहणाऱ्या या अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराला आता पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा आहे. अन्यथा, हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top