mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय ‘अस्मिता लीग’ क्रीडा स्पर्धेचे आयोजन : District level ‘Asmita League’ sports competition organized on the occasion of International Women’s Day

शेअर करा :

District level ‘Asmita League’ sports competition organized on the occasion of International Women’s Day : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय ‘अस्मिता लीग’ क्रीडा स्पर्धेचे आयोजन

District level 'Asmita League' sports competition organized on the occasion of International Women's Day

बुलढाणा :  आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून युवक कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली नेहरु युवा केंद्र(My Bharat) व जिल्हा क्रीडा कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८  मार्च २०२६  रोजी सकाळी ८  वाजता तालुका क्रीडा संकुल, चिखली येथे जिल्हास्तरीय “अस्मिता लीग” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा १३  वर्षाखालील,१३  ते  १८  वयोगट व १८  वर्षावरील मुली व महिलांसाठी आयोजित करण्यात आली असून, १००  मीटर, २००  मीटर व ४००  मीटर धावण्याच्या स्पर्धांचा समावेश आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी अस्मिता पोर्टल https://nsrs.kheloindia.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी खेलो इंडिया प्रशिक्षक अक्षय गोलांडे (मो.९९७५१०५२२२ ) तसेच जिल्हा युवा समन्वयक आकाश साळोक (मो. ८३७९८९०१०१ ) यांच्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुली व महिलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी प्रणीत सांगवीकर व जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top