mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

अफवांवर विश्वास ठेवू नका : Do not believe in rumors.

शेअर करा :

Do not believe in rumors. : अफवांवर विश्वास ठेवू नका: बुलढाणा जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध

Do not believe in rumors.


बुलढाणा, दि. 21 : गेल्या काही दिवसांपासून इंधन तुटवड्याच्या अफवांनी बुलढाणा जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी वाढवली आहे. नागरिक मोठ्या प्रमाणात इंधन साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. मात्र, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री, नामदार मकरंद पाटील यांनी या सर्व अफवा फेटाळून लावत, जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी नागरिकांना संयम बाळगून आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करण्याचे आणि पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे.

 

इंधन पुरवठ्याची सद्यस्थिती:

जिल्ह्यात इंधनाचा समाधानकारक साठा उपलब्ध असून, पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत आहे. आज, 21 मे रोजी विविध ऑईल कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात इंधनाचा पुरवठा झाला आहे:

 

• BPCL: 1 लाख 2 हजार 500 लिटर पेट्रोल आणि 3 लाख 5 हजार 500 लिटर डिझेल.

• HPCL: 1 लाख 5 हजार लिटर पेट्रोल आणि 3 लाख 74 हजार लिटर डिझेल.

• IOCL: 6 लाख 80 हजार लिटर पेट्रोल आणि 7 लाख 25 हजार लिटर डिझेल.

 

यामुळे, सध्या जिल्ह्यात एकूण 8 लाख 87 हजार 500 लिटर पेट्रोल आणि 14 लाख 4 हजार 500 लिटर डिझेल उपलब्ध आहे. दररोज नव्याने इंधनसाठा प्राप्त होत असल्याने भविष्यातही कोणतीही कमतरता भासणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

गॅस सिलेंडरची उपलब्धता:

इंधनाप्रमाणेच गॅस सिलेंडरबाबतही जिल्ह्यात कोणतीही कमतरता नाही. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियमचे नियमित 4 लाख 63 हजार 494 ग्राहक असून, उज्वला योजनेंतर्गत 2 लाख 5 हजार 715 ग्राहकांना सेवा दिली जात आहे. दररोज सुमारे 7 हजार 950 गॅस सिलेंडर ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात येत असून, 16 हजार 448 सिलेंडरचा साठा राखीव आहे. कंपन्यांकडून दररोज याच पद्धतीने इंधनाचा पुरवठा होणार असल्याचे पुरवठा शाखेने सांगितले आहे.

 

प्रशासनाची भूमिका:

जिल्हा प्रशासन सर्व ऑईल कंपन्या आणि पेट्रोल पंप धारकांच्या सतत संपर्कात आहे. पेट्रोल पंपांवर इंधनाचे वाटप सुरळीत व्हावे आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनालाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अनावश्यक साठेबाजी टाळावी आणि केवळ आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी, असे आवाहन पालकमंत्री नामदार मकरंद पाटील यांनी केले आहे. यामुळे सर्वांना इंधनाचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे.

 

शेतकऱ्यांसाठी विशेष आवाहन:

शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी आवश्यक तेवढे इंधन उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी इंधनाची साठेबाजी करू नये, तसेच पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नामदार मकरंद पाटील यांनी केले आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top