Eknath Dawle gets special praise from the Chief Minister : महाराष्ट्राच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या वतीने आयोजित ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा’ आणि ‘महा आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ’ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.

महाआवास अभियानात उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव
सातारा/प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या वतीने आयोजित ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा’ आणि ‘महा आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ’ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाआवास’ अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, जिल्हे, तालुके आणि गावांचे जाहीर कौतुक केले. यामध्ये मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ डवले यांचे विशेष कौतुक करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान केल्याची बाब जिल्हावासियांसाठी अभिमानास्पद ठरली आहे.
महाराष्ट्राच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या वतीने आयोजित ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा’ आणि ‘महा आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ’ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महा आवास’ अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, जिल्हे, तालुके आणि गावांचे जाहीर कौतुक केले.
उत्कृष्ट कामाची प्रशंसा:
व्यासपीठावरून बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राज्यात वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून अतिशय उत्तम काम सुरू आहे. ज्या लोकांनी, अधिकाऱ्यांनी, जिल्ह्यांनी, तालुक्यांनी आणि गावांनी प्रधानमंत्री आवास योजनेत उत्कृष्ट काम केले आहे, त्या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो.”
ग्रामविकास मंत्री आणि टीमचे विशेष कौतुक:
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे विशेष आभार मानले. “खऱ्या अर्थाने हे शिवधनुष्य पेलण्याचे काम जयकुमार गोरे यांनी केले आहे,” अशा शब्दांत त्यांनी मंत्र्यांच्या कामगिरीचा गौरव केला. यासोबतच, ग्रामविकास विभागाचे तत्कालीन अप्पर मुख्य सचिव एकनाथ डवले आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केलेल्या अविरत परिश्रमांचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
या सोहळ्याला राज्यातील विविध भागांतून आलेले लाभार्थी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. घरकुलांचे स्वप्न पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद या सोहळ्यात प्रकर्षाने दिसून आला.
घरकुलांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या ‘महा आवास’ योध्यांचा गौरव
महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) लाभार्थी मेळावा’ आणि ‘महा आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभात’ उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या भाषणात ग्रामविकास मंत्री मा. जयकुमारजी गोरे आणि तत्कालीन सचिव एकनाथजी डवले यांच्यासह संपूर्ण टीमचे ‘शिवधनुष्य पेलल्याबद्दल’ विशेष कौतुक केले.

एकनाथ डवले साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा:
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे अत्यंत प्रभावीपणे आणि जबाबदारीने काम करणारे ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव मा. एकनाथजी डवले साहेब यांचा वाढदिवस आज सातारा येथे केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/
सातारा येथील आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या ग्रामविकास विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी मा. एकनाथजी डवले साहेब यांना शुभेच्छा देऊन पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी व यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.


