mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

चुलत भावासोबतच्या अनैतिक संबंधातून वडील, भावाने केली मुलीची हत्या : Father, brother kill daughter over illicit relationship with cousin

शेअर करा :

Father, brother kill daughter over illicit relationship with cousin : जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात धड व मुंडके आढळून आलेल्या महिलेचा तिचे वडील आणि भावानेच खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.


Father, brother kill daughter over illicit relationship with cousin
पोलिसांनी अटक केलेले आरोपी वडील व भाऊ

एलसीबीने उकलले मुंडके छाटलेल्या महिलेच्या हत्येचे गूढ

बुलढाणा : जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात धड व मुंडके आढळून आलेल्या महिलेचा तिचे वडील आणि भावानेच खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी सलग बारा दिवस तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला. चुलतभावासोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे तिची हत्या करण्यात आली. मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर मृतक महिलेचे सासर अमरावती जिल्ह्यातील आहे.

दि.26/04/2026 रोजी पो.स्टे. जळगांव जामोद येथे फिर्यादी मीना मनिष तडवी, रा. सुनगाव ता. जळगाव जा. यांनी रिपोर्ट दिला की, दि.26/04/2026 रोजीचे 09/30 वा. पूवी ग्राम राजूरा शिवारातील आसिफ हमीद मुल्लाजी यांचे शेत धुऱ्यावरील लिंबाच्या झाडाजवळ व नदीचे काठावर एक मानवी कवटी अर्धवट जळालेली तसेच शंभर मिटर अंतरावर स्त्री जातीचे प्रेत वय अं.20 ते 25वर्षे, उंची ५ फुट ४ इंच असे मुंडके नसलेल्या अवस्थेत, अर्धवट जळालेले, पायामध्ये लाल कथीया रंगाचा पायजामा, गळ्या भोवती काळसर रंगाचा स्कार्फ, गळ्यात काळ्या मण्यांची व पांढऱ्या धातूची पोथ, पायाजवळ गुलाबी रंगाच्या चप्पलचा जोड अशा वर्णणाचे प्रेत पडलेले आहे. सदर महिलेचा कोणीतरी अज्ञात आरोपीने, अज्ञात कारणावरुन, अज्ञात हत्याराने जिवे ठार मारुन, तिचे शिर व धड वेगवेगळे करुन, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत जाळून टाकलेले आहे. अशा तक्रारीवरुन पो.स्टे. जळगांव जामोद येथे अप.क्र. 283/2026 कलम 103(1), 238 भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा नोंद आहे. सदर गुन्ह्याचे घटनास्थळी मा. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, आनंद महाजन उपविपोअ. मलकापूर, पोनि सुनील अंबुलकर स्था.गु.शा. बुलढाणा यांनी भेट दिली. सदर गुन्ह्याची गंभीरता, संवेदनशिलता तसेच जनमानसात निर्माण झालेली भिती लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांना यातील मृतक महिलेची ओळख पटवून, गुन्ह्याची उकल करुन, आरोपोचा शोध घेऊन त्यास अटक करणेबाबत आदेशित केले होते. प्रकरणी, पोनि सुनिल अंबुलकर यांनी अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांची तपासकामी वेगवेगळी पथके तयार करुन, सदर पथकांना वरिष्ठांच्या निर्देशांप्रमाणे कारवाई करणेबाबत आदेशीत केले.

सदर गुन्ह्याच्या तपासातमध्ये, अंबुलकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी जळगाव जामोद, संग्रामपूर, लगत जिल्हे जळगाव खांदेश, अमरावती, अकोला तसेच बुरहानपूर (म.प्र.) या ठिकाणी पथके पाठवून मृतक महिलेची ओळख आणि आरोपीचा शोध घेतला. सदर घटनास्थळ मध्यप्रदेश राज्याची सीमेला लागून असल्याने पथकांना बुरहानपुर जिल्ह्यातील सर्व लगत पोलीस स्टेशनच्या अभिलेखांवरील मिसींग महिलांचा शोध घेण्यात आला. गोपनीय बातमीदार व ईतर स्त्रोतांकडून माहिती घेण्यात आली. सदर गुन्ह्यामध्ये नेमण्यात पथकांनी सतत १२ दिवस समांतर तपास केला. दरम्यान 09/5/2026 रोजी स्था.गु.शा.च्या पथकाला माहिती मिळाली की, पो.स्टे. खकणार जि. बुरहानपुर येथे 01/05/2026 रोजी बापूराम नथ्थू कलमेकर वय 50 वर्षे रा. खडकी म.प्र. यांनी त्यांची मुलगी शिवानी बापुराम कळमेकर (पती कडील नांव सौ. शिवानी प्रकाश भिलावेकर रा. खाऱ्या टेंभूर ता. धारणी जि. अमरावती) ही 25/04/2026 रोजी पासून कोणाला काहीएक न सांगता घरुन निघून गेली असल्याबाबत तक्रार दिलेली आहे. त्या बाबत मिसींग क्र. 41/2026 प्रमाणे नोंद आहे. तपासात सदर मिसींग महिलेची माहिती घेऊन पथकांनी बापूराम नथ्थू कलमेकर वय 55 वर्षे, अजय बापूराम कलमेकर वय 27 वर्षे, दोन्ही रा. खडकी ता. खकनार जि, बुरहानपुर (म.प्र.) यांना ताब्यात घेतले. नमुद दोघांनाही विश्वासात घेऊन, त्यांना सखोल व बारकाईने विचारपूस केली. त्यामध्ये आरोपी यांनी कबुली देत मृतक महिला ही त्यांची मुलगी बहिण शिवानी बापुराम कलमेकर असल्याचे व त्यांनीच तिला जिवे ठार मारल्याची कबुली दिली. तपासामध्ये मृतक शिवानी बापुराम कलमेकर हिचा दि. 15/04/2026 रोजी प्रकाश बालाराम भिलावेकर रा. खाऱ्या टेंभुर ता. धारणी जि. अमरावती याचे सोबत विवाह झालेला आहे. शिवानी दि. 20/04/2026 रोजी सासरवरुन वडीलांचे घरी माहेरी ग्राम खडकी येथे आलेली होती. दरम्यान दि.23/04/2026 रोजी रात्रीचे सुमारास मृतक शिवानी कलमेकर हिचे चुलत भावा सोबत प्रेम असल्याने व ती लग्न होऊन सुध्दा ऐकत नसल्याने, वडील बापुराम कलमेकर याने मुलगी मृतक शिवानी हिचे डोक्यात बांबु मारुन तिला जिवे ठार मारले. त्या नंतर आरोपी यांनी मृतक शिवानी हिचे प्रेत एक दिवस घरामध्ये ठेऊन दुसरे दिवशी वडील बापूराम नथ्थु कलमेकर यांनी मुलगा अजय बापूराम कलमेकर (मृतकचा भाऊ) दोन्ही रा. खडकी ता. खकनार यांनी मोटार सायकलने मृतकचे प्रेत बुलढाणा जिल्ह्यातील पो.स्टे. जळगाव जामोद हद्दीतील ग्राम राजूरा शिवारामध्ये आणून टाकले. आरोपी यांनी मृतक हिची ओळख पटू नये म्हणून जाळण्याचा प्रयत्न केला. धड व मुंडके वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले व स्वतःचे रक्ताने भरलेले कपडे व हत्यारे जंगलामध्ये फेकून दिले. सदर घटने नंतर मृतक शिवानी बापुराम कळमेकर शिवानी प्रकाश भिलावेकर रा.खाऱ्या टेंभूर ता. धारणी जि. अमरावती ही घरुन निघून गेल्याचो पो.स्टे. खकणार येथे तक्रार दिली. असे आरोपी यांनी पोलीस तपासामध्ये कबुली दिलेली आहे. गुन्ह्यामध्ये पोलीस निरीक्षक अंबुलकर यांचे नेतृत्वातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी आरोपी बापूराम नथ्धु कलमेकर वय 55 वर्षे (मृतकचे वडील) व अजय बापूराम कलमेकर वय 27 वर्षे, (मृतकचा भाऊ) दोन्ही रा. खडको ता. खकनार जि. बुरहानपुर (म.प्र.) यांना पकडून पो.स्टे. जळगांव जामोद यांच्या ताब्यात पुढील कायदेशीर कार्यवाहीकामी दिलेले आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन जळगांव जामोद करीत आहेत.

 

सदरची कारवाई मा.श्री. निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे आदेशान्वये तर श्रेणिक लोढा अपर पोलीस अधीक्षक खामगाव, अमोल गायकवाड अपर पोलीस अधीक्षक बुलडाणा, आनंद महाजन उपविपोअ मलकापूर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि सुनिल अंबुलकर स्था.गु.शा. बुलढाणा यांचे नेतृत्वात सपोनि. यशोदा कणसे, पोउपनि, पंकज सपकाळे, पोहेको. एजाज खान, गणेश पुरुषोत्तम पाटील, अजीज परसुवाले, अमोल शेजोळ, मंगेश सनगाळे, अमोल वनारे, दिपक वायाळ, राकेश नायडू, चापोहेको. समाधान टेकाळे, शिवानंद हेलगे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा, पोलिस शिपाई कैलाश ठोंबरे तांत्रिक विश्लेषण विभाग, बुलढाणा यांच्या पथकाने केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top