mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

बुलढाणा बाजार समितीच्या चांडोळ उपबाजारासाठी पाच एकर जागा मंजूर : Five acres of land sanctioned for the Chandol sub-market of the Buldhana Market Committee.

शेअर करा :

Five acres of land sanctioned for the Chandol sub-market of the Buldhana Market Committee. : बुलढाणा बाजार समितीच्या चांडोळ उपबाजारासाठी पाच एकर जागा मंजूर: शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार

Five acres of land sanctioned for the Chandol sub-market of the Buldhana Market Committee.


बुलढाणा प्रतिनिधी : बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चांडोळ उपबाजारासाठी पाच एकर जागा मंजूर झाल्याने विदर्भ आणि मराठवाडा सीमेवरील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल योग्य भावात विकण्यासाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे, अशी प्रतिक्रिया सभापती जालिंदर बुधवत यांनी दिली आहे.

जालिंदर बुधवतांचा पाठपुरावा यशस्वी

शासकीय निधीचा कोणताही आधार नसताना, स्व-उत्पन्नाचे स्रोत वाढवून बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासामध्ये मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सभापती जालिंदर बुधवत यांच्या आणखी एका सकारात्मक निर्णयाची अंमलबजावणी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चांडोळ येथे उपबाजार सुरू व्हावा यासाठी जालिंदर बुधवत यांनी गेल्या सहा ते सात वर्षांपासून मंत्रालय स्तरावर स्वतः पाठपुरावा करत सकारात्मक हालचाली सुरू केल्या होत्या. त्यासाठी जागेची मुख्य अडचण होती. वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, चांडोळ येथील गट नंबर ६५९ मधील ई वर्गाची दोन हेक्टर आर. अर्थात पाच एकर शासकीय जमीन उपबाजाराच्या प्रयोजनासाठी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या आदेशाने नाममात्र एक रुपया या दराने महाराष्ट्र शासनाने मंजूर केली आहे. जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला ही जागा हस्तांतरित केली आहे.

शेतकरी हितासाठी महत्त्वाचे पाऊल

शेतीविषयक धोरण बदलत असताना कृषी उत्पन्न बाजार समित्यांना टिकाव धरण्यासाठी आर्थिक उत्पन्नाचे स्रोत वाढवणे गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीला चांडोळ येथे उपबाजार सुरू करण्यासाठी शासनाकडून पाच एकर जागा मंजूर झाली आहे. चांडोळ परिसरातील अनेक शेतकरी मराठवाडा भागात शेतमाल विक्रीसाठी नेतात. बाजार समितीने चांडोळ येथे उपबाजार सुरू केल्यास याचा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होऊन आपसूकच उत्पन्न देखील वाढेल हा हेतू समोर ठेवून जालिंदर बुधवत यांनी सातत्याने प्रयत्न केले. यात जागा ही बाब मुख्य अडचण होती. राज्य सरकारने जागा मंजूर केल्याने हा अडचण दूर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ५० ते ६० किमी चा फेरा वाचणार आहे.

बुलढाणा बाजार समितीचा कायापालट

कधीकाळी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी देखील डबघाईस आलेल्या बुलढाणा बाजार समितीत सभापती जालिंदर बुधवत यांच्या माध्यमातून गेल्या १० वर्षात झालेल्या प्रयत्नांमुळे मोठा बदल घडून आला आहे. ड वर्गातून अ वर्गात ही बाजार समिती आणली. अंतर्गत सुविधा, प्रशासकीय इमारती निर्माण, बुलढाणा, दुधा व धाड येथे उत्पादन ठेवण्यासाठी गोडाऊन व्यवस्था, गाळे बांधकामातून कायमस्वरूपी मिळालेला उत्पन्नाचा स्रोत, जिल्ह्यातील एकमेव बुलढाणा बाजार समितीला असलेला दुधा येथील पेट्रोल पंप बाजार समितीच्या विकासात भर घालत आहे.

खाजगी लुटीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण

शेतमाल विक्री करताना खासगी लुटीचे आणि फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी उपबाजार चांडोळ परिसरातील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. संपूर्ण संचालक मंडळ व प्रशासकीय सदस्य यांचे पाठबळ आपल्याला लाभत असून लवकरच पुढील कार्यवाही पूर्ण करू अशी प्रतिक्रिया जालिंदर बुधवत यांनी बोलताना दिली आहे. जागा हस्तांतरणाबाबतचा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित केल्यानंतर सभापती जालिंदर बुधवत यांनी सर्व संचालकांच्या वतीने आज जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांची भेट घेऊन त्यांचे आभार देखील मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top