mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

अंबाबरवा अभयारण्यात वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर : Herdsman critically injured in tiger attack at Ambabarva Sanctuary

शेअर करा :

Herdsman critically injured in tiger attack at Ambabarva Sanctuary : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अंबाबरवा अभयारण्यात बफर क्षेत्रातील जटाशंकर परिसरात वाघाने केलेल्या हल्ल्यात गुराखी युवक गंभीर जखमी झाला. सोमवार, ६ जुलै रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.


 

Herdsman critically injured in tiger attack at Ambabarva Sanctuary
घटनास्थळी पंचनामा करताना वन कर्मचारी

आदिवासीपट्ट्यात दहशत

बुलढाणा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अंबाबरवा अभयारण्यात बफर क्षेत्रातील जटाशंकर परिसरात वाघाने केलेल्या हल्ल्यात गुराखी युवक गंभीर जखमी झाला. सोमवार, ६ जुलै रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. जखमी युवकावर अकोला येथे उपचार सुरू आहेत.

Herdsman critically injured in tiger attack at Ambabarva Sanctuary

संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी ग्राम हाडियामाल येथील अनिल अर्जुन सोळंके (वय २६) हा तरुण गुराख्यांसोबत गुरे चारण्यासाठी अंबाबरवा अभयारण्यात गेला होता. ६ जुलैच्या दुपारी तीनच्या सुमारास सोनबर्डी बीटमधील कंपार्टनेट नंबर ३६३ मध्ये जटाशंकर परिसरात या युवकावर वाघाने हल्ला केला. चेहरा, पाठ, हात, छाती, पोटावर वाघाने पंजे मारल्याने तो गंभीर जखमी झाला. या हल्ल्याच्या काही वेळापूर्वी वाघाने दोन गायी व तीन वासरांवरही हल्ला केला होता. अभयारण्यात गस्तीवर असलेले वनपाल देव बेराड व वनपाल राठोड यांना ही मिळताच गावकऱ्यांच्या मदतीने जखमी अनिल यास रुग्णालयात हलविण्यात आले. शेगाव येथून अकोला रेफर करण्यात आले. जखमीची प्रकृती स्थीर असल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

दरम्यान, मंगळवारी सकाळी सोनाळा वनपरिक्षेत्र (वन्यजीव) कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी शोध मोहीम सुरू केली. सोनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावने, सोनबर्डी बीडचे वनपाल एस.डी. राठोड, वनरक्षक डी.ए. बेराड यांच्यासह आदिवासी नागरिक व वनमजूर उपस्थित होते.

 

घटनास्थळी लावले ट्रॅप कॅमेरे

घटनास्थळी पंचनामा करताना वाघाच्या पायाचे ठसे आढळले. याशिवाय वाघाने ठार केलेल्या गायी व वासराचे अवशेषही दिसून आले. या भागात वाघाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी घटनास्थळी दोन ट्रॅप कॅमेरे लावल्याचे सोनाळा वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावने यांनी सांगितले. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top