Kuntankhana at Shivraj Wine Bar in Mehkar : मेहकर शहरातील हॉटेल शिवराज वाइनबार राजरोसपणे चालत असलेला कुंटणखाना पोलिसांनी बुधवार, २७ मे २०२६ रोजी साडेचार वाजेच्या सुमारास उद्ध्वस्त केला. पोलिसांनी धाड घालून देहव्यापार करून घेणाऱ्या हॉटेल मालकासह दोघांना अटक केली आहे.

आसिफ शाह
मेहकर : शहरातील हॉटेल शिवराज वाइनबार राजरोसपणे चालत असलेला कुंटणखाना पोलिसांनी बुधवार, २७ मे २०२६ रोजी साडेचार वाजेच्या सुमारास उद्ध्वस्त केला. पोलिसांनी धाड घालून देहव्यापार करून घेणाऱ्या हॉटेल मालकासह दोघांना अटक केली आहे. मागील काळात बायपास रोडने एका हॉटेलला चालणारा असाच वेश्याव्यवसाय पोलिसांनी मोडून काढला होता.
विजय विष्णू लादे ( वय ३६) रा. संतोषी मातानगर, मेहकर व प्रमोद मुरलीधर धोंडगे (वय ४८) रा. चनखोरे कॉलनी, मेहकर अशी कुंटणखाना चालविणाऱ्या आरोपींची नावे आहेत. धोंडगे याच्या मालकीचे हॉटेल शिवराज वाइनबार व्हेज अँड नॉनव्हेज डोणगाव रोडवर आहे. या ठिकाणी महिलांकडून देहविक्रय व्यवसाय करून घेतला जात होता. सामाजिक दृष्ट्या हा धंदा गंदा असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, मेहकर पोलीस ठाण्याचे ठाणेदार व्यंकटेश आलेवार यांनी २७ मे रोजी सव्वाचार वाजेच्या सुमारास हॉटेल शिवराज वाइनबार येथे छापा मारला. यावेळी विजय लादे व प्रमोद धोंडगे या दोघांना अटक करण्यात आली. तर पीडित महिलांची सुटका करण्यात आली. आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशाचे प्रलोभन देवून देहव्यापार करण्यास प्रवृत्त केले. आरोपींच्या ताब्यातून मोबाइल आणि इतर साहित्य असा १० हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आणखी बातम्या वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा👉
पोलीस शिपाई केशव अवचार यांनी दिलेल्या तक्रारीवरून मेहकर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम ३, ४, ५, ६, ७ अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार व्यंकटेश आलेवार, पोहेकॉ लक्ष्मण कटक, शिवनकर करीत आहेत.


