mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

डेलीनीडच्या दुकानात पेट्रोल विक्री : Sale of petrol at the Daily Need store.

शेअर करा :

Sale of petrol at the Daily Need store. : डेलीनीडच्या दुकानात पेट्रोल विक्री : दुकानदारास अटक

 

 

Sale of petrol at the Daily Need store.
 २७० लिटरचा पेट्रोल जप्त

मेहकर : डोणगाव पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या अंजनी बुद्रुक या ठिकाणी अवैधरित्या पेट्रोलचा साठा करून त्याची चढ्या भावात विक्री करणाऱ्या डेलीनिड चालविणाऱ्या दुकानदारास डोणगाव पोलिसांनी अटक केली.

अंजनी बुद्रुक येथे ग्रामपंचायतसमोरील भागामध्ये भागवत लाड यांचे डेलीनिडचे दुकान आहे. याच दुकानात त्यांनी बेकायदा इंधन विक्री सुरू केली होती. दुकानावर पेट्रोल विकत असल्याची माहिती डोणगाव पोलीस स्टेशनला मिळाली असता त्या ठिकाणी छापा मारला. तेव्हा एका २० लिटरच्या कॅनमध्ये पेट्रोल व बिसलरीच्या बॉटल भरून पेट्रोल विकणे सुरू होते. तेव्हा पोलिसांनी पाहणी करून पेट्रोलचा साठा तपासण्यासाठी भागवत लाड यांचे घर गाठले असता त्याच्या राहत्या घरी ज्वालाग्रही असे २७० लिटर पेट्रोल साठवलेले मिळून आले. हे पेट्रोल २० ते ४० लिटरच्या कॅनमध्ये मिळून आले. यावर डोणगाव पोलिसांनी कार्यवाही केलेली असून पेट्रोलचे नमुने घेऊन समोरील कारवाईसाठी पुरवठा विभागाला माहिती देण्यात येणार आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये ठाणेदार गणेश इंगोले, पोलीस निरीक्षक विजय अजमेरे, पवन गावणे, जाकिर व अरुण सरदार यांनी केली.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top