mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

चोरट्यांचा पोलिसांवर हल्ला; पोलिसांच्या घरात चोरीचा प्रयत्न : Thieves attack police

शेअर करा :

चोरट्यांचा पोलिसांवर हल्ला; पोलिसांच्या घरात चोरीचा प्रयत्न : Thieves attack police

Thieves attack police
श्वान पथक चोरट्यांचा माग काढताना

मेहकरच्या लक्ष्मीनारायण सोसायटीमध्ये  धुमाकूळ


Thieves attack police


मेहकर : येथील डीपी रोडस्थित लक्ष्मीनारायण सोसायटीमध्ये २२ मे च्या पहाटे साडेतीन वाजता बंद दरवाज्याची टेहळणी करून रात्री चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या चोरांना हाती काही विशेष लागले नाही. या चोरट्यांनी पोलिसांच्या घरात शिरून चोरीचा प्रयत्न केला. त्याचवेळी कर्तव्य बजावून घराकडे पोहोचलेल्या दोन पोलिसांवर चोरट्यांनी टॉमीने हल्ला केला. यात पोलिस गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे मेहकर शहरात चोरट्यांची दहशत पसरली आहे. चोरी करण्यासाठी आलेले चोरटे हे सर्व अर्थानं सुसज्ज असे दिसून आले.

 

मेहकर येथील लक्ष्मीनारायण सोसायटी ही सोसायटी मेहकर उच्चभ्रू सोसायटी म्हणून संबोधली जाते. २२ मेच्या पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास सोसायटीमध्ये बंद असलेल्या घराला टार्गेट करण्यासाठी चोरटे गेले. या चोरट्यांनी सोसायटीमधील कुलूपबंद काही घरांना फोडले. मात्र त्यांना म्हणावे तसे काही हातात लागले नाही. अशातच लोणार येथे कर्तव्यावर असणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्यांच्या घराचे कुलूप फोडत असताना तेवढ्यातच मेहकर पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकृष्ण गवई व पोलीस वाहनचालक शिवाजी चिम हे त्या ठिकाणी पोहोचले. दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी श्रीकृष्ण गवई या पोलिसाच्या डोक्यावर टॉमीने वार केला. तर शिवाजी चिम यांच्या डोक्यावर वर करत असताना त्यांनी हात डोक्यावर लावल्याने ते वाचले. डोक्यावरील वार त्यांच्या बोटाला बस मार लागला. या चोरट्यांनी एका रात्री कुलूप लावलेले चार घरे फोडली. यात किती मुद्देमाल चोरीला गेला याची माहिती अजून मिळालेली नाही. मेहकर पोलिसांनी चोरीचा तपास लावण्यासाठी डॉग स्कॉड व फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना पाचारण केले होते.

मेहकर येथील या चोरीच्या प्रकरणांमध्ये जे तीन चोरटे आलेले होते ते सुसज्ज असे होते. त्यांच्या हातात सुद्धा हॅन्ड ग्लोज घातलेले होते. ज्याला पाहता हे चोरटे सराईत गुन्हेगार असून यांचा तपास लागणे गरजेचे आहे. पोलिसांवर चोरट्यांनी केलेल्या हल्ल्याची मेहकर तालुक्यात एकच चर्चा सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top