mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

नागेशवाडीतील अत्यवस्थ तीस रुग्णांना उपचारासाठी केले रेफर : Thirty patients were referred for treatment.

शेअर करा :

Thirty patients were referred for treatment : डायरियाच्या प्रकोपाने आदिवासीबहुल नागेशवाडी येथे शंभरपेक्षा जास्त रुग्ण सापडल्याने प्रशासनाची भंबेरी उडाली. यासंदर्भातील वृत्त महादेशामध्ये प्रकाशित होताच प्रशासन खडबडून जागे झाले. आरोग्य पथक गावात दाखल झाले असून औषधोपचार सुरू करण्यात आले. महिला व पुरुष अशा तीस जणांना पुढील उपचारासाठी मेहकर व जानेफळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.


Thirty patients were referred for treatment

महादेशाच्या वृत्ताने हादरले प्रशासन : यंत्रणा अलर्ट

मेहकर : डायरियाच्या प्रकोपाने आदिवासीबहुल नागेशवाडी येथे शंभरपेक्षा जास्त रुग्ण सापडल्याने प्रशासनाची भंबेरी उडाली. यासंदर्भातील वृत्त महादेशामध्ये प्रकाशित होताच प्रशासन खडबडून जागे झाले. आरोग्य पथक गावात दाखल झाले असून औषधोपचार सुरू करण्यात आले. महिला व पुरुष अशा तीस जणांना पुढील उपचारासाठी मेहकर व जानेफळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर कमी प्रमाणात त्रास असलेल्या बाधितांवर ६० रुग्णांवर घरीच सलाईनद्वारे उपचार सुरू आहेत.

Thirty patients were referred for treatment

महादेशाच्या वृत्ताने जिल्हा प्रशासन हादरले. आदिवासीबहुल नागेशवाडी येथील रुग्णांची पाहणी करण्यासोबतच पाण्याचे स्रोत तपासण्यात आले. आरोग्य पथकातील वीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपासणी सुरू केली आहे. पाण्याचे स्त्रोत असलेली सार्वजनिक पाण्याची विहीर व प्रत्येक घरातील पाणी ब्लिचिंग पावडर टाकून शुद्धीकरण करण्यात आले. घाटबोरी गट ग्रामपंचायतमध्ये येणाऱ्या ग्राम नागेशवाडी येथे १४० कुटुंबसंख्या असून लोकसंख्या पाचशेच्या जवळपास आहे. शंभरपेक्षा जास्त रुग्णांना डायरियाची लागण झाली आहे. यासंदर्भातील वृत्त महादेशाने प्रसारित करताच जिल्हा प्रशासन कामाला लागले. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय बलकार यांनी देऊळगाव साकर्षा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत राठोड तसेच आरोग्य सेवक, सेविका यांची टीम घेऊन नागेशवाडी येथे पोहोचली. या गावात जाऊन घरोघरी रुग्णांची तपासणी केली. ज्या रुग्णांना जास्त प्रमाणात डायरिया झाला अशा १९ रुग्णांना रुग्णवाहिकेद्वारे मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. तसेच काहीना जानेफळ येथील रुग्णालयात पाठवण्यात आले.

सिताराम आत्माराम खिल्लारी, गजानन धंदरे, ज्ञानेश्वर शेळके, पुरुषोत्तम चोंडकर, भिकाबाई चोंडकर, नामदेव शेळके, उत्तम ढोके, कल्पना शिंदे, रेणुका खिल्लारी, वंदना धंदरे, महादेव डाखोरे, कौशल्या ढोके, जिजाबाई धंदरे, सुनिता इंगळे, मन कर्णा धंदरे, ललिता खिल्लारे, चंद्रभागा ढोके, यमुना भोयार, लंकाबाई लठाड यांच्यासह अनेकजण बाधित आहे गावात अजून काही रुग्ण होते. ज्यांना डायरीयाचा त्रास जाणवत होता. अशा १२ रुग्णांना जानेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी भरती करण्यात आले. लक्ष्मण डाखोरे, ललिता डाखोरे, गोविंदा लठाड, पंचकुला लठाड, राधा शिंदे, यमुना खिल्लारी, पदमाबाई धंदरे, द्रौपदीने डाखोरे, लक्ष्मी धंधरे, जिजाबाई डाखोरे, पिलाबाई डाखोरे हे रुग्ण त्रस्त आहेत. 

 

गावात अजून बरेच रुग्ण असून, रात्री कुणाची प्रकृती बिघडली तर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका तत्पर ठेवण्यात आहे. एक ॲम्बुलन्स जिल्हा परिषद मराठी शाळेसमोर उभी करण्यात आली आहे. ज्या लोकांना अस्वस्थ वाटले त्यांना त्काळ तिथून जानेफळ प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात येणार आहे.

जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे व त्यांच्या टीमने टेंभुर्खेड येथील सरकारी पाण्याच्या विहिरीचे सुपर क्लोरीनेशन केले.तसेच नागेशवाडी येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचे सुद्धा क्लोरीनेशन केले. यासोबतच गावातील प्रत्येक घरात जाऊन त्या ठिकाणी असलेले पाणी सुद्धा शुद्ध करण्यात आले.

 

गावातील लोकांचे म्हणणे होते की ज्याप्रमाणे गावात येणारे डॉक्टर घरोघरी जाऊन सलाईन लावतात, त्याचप्रमाणे गावात जिल्हा परिषद शाळेमध्ये अस्थायी स्वरूपाचे कॅम्प लावून उपचार का केल्या जात नाही. ज्याला पाहता आम्हाला दूर जावे लागणार नाही. एकीकडे याच प्रशासनाने वेळीच लक्ष दिले असते तर पाण्याचे नमुने तपासले असते तर आम्ही असे आजारी पडलो नसतो, ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

 

ग्रामपंचायत देणार आरोचे पाणी

ज्या ग्रामपंचायतीने आज पर्यंत नागेश वाडी येथील पिण्याच्या पाण्याची समस्या जाणून घेतली नाही आता तेच प्रशासन उद्या गावात जारचे पाणी वाटप करणार व प्रत्येक घरी जार देणार आहे. नागेश वाडी येथील लोकांनी महादेशा न्यूजचे आभार मानले. तुमच्यामुळे आमच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचल्या आणि झोपलेले प्रशासन जागे झाले, अशा भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top