Two cousins drowned in a quarry : पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळील खदानीमध्ये पाय धुण्यासाठी उतरलेली दोन चिमुकली मुले बुडाली. अद्याप दोघेही पाण्यात सापडली नाहीत.
मेहकर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
मेहकर : पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळील खदानीमध्ये पाय धुण्यासाठी उतरलेली दोन चिमुकली मुले बुडाली. अद्याप दोघेही पाण्यात सापडली नाहीत. मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी गावापासून जवळच असलेल्या कोराडी प्रकल्प क्षेत्रात ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी9 साडेपाच वाजेचा सुमारास ही घटना घडली.
I
आयान राजू शेख (वय १०, रा. देऊळगाव माळी) आणि त्याचा मावसभाऊ आवेद इब्राहिम शेख (वय ११, रा. लोणार) अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. दोघे शेख आसिफ शेख हुसेन यांच्यासोबत कोराडी धरणावर गेले होते. धरणाच्या पाण्यालगत पाणीपुरवठ्यासाठी विहीर आहे. त्याठिकाणी दीडशे फूट १५० खोल व ४५ फूट आकाराची खदान खोदलेली आहे. त्यामध्ये धरणाचे पाणी साचले आहे. पाय धुण्यासाठी दोघे मावसभाऊ पाण्यात उतरले. पाणी जमिनीच्या बरोबरीने दिसत असल्याने त्यांना खोल खदान समजली नाही. दोघेही पाण्यात बुडाले. ते कपारीत अडकल्याची भीती व्यक्त होत असून त्यांचा सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत शोध घेण्यात आला. मात्र ते आढळून आले नाहीत.

