Yogeshwar Parate wins gold in Kabaddi : राष्ट्रीय स्तरावर झालेल्या कबड्डी स्पर्धेत महावितरण बुलढाणा शहर भाग २ उपविभागीय कार्यालय येथे कार्यरत कबड्डी खेळाडू योगेश्वर पराते याने कबड्डी महावितरण महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करत सुवर्ण पदक जिंकले.

विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यश
बुलढाणा : अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या ४७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुणे येथे पार पडल्या. राष्ट्रीय स्तरावर झालेल्या कबड्डी स्पर्धेत महावितरण बुलढाणा शहर भाग २ उपविभागीय कार्यालय येथे कार्यरत कबड्डी खेळाडू योगेश्वर पराते याने कबड्डी महावितरण महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करत सुवर्ण पदक जिंकले.
महावितरण कबड्डी संघ महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल प्रदेश संघादरम्यान अंतिम सामना झाला. अंतिम लढतींमध्ये महाराष्ट्र महावितरण संघाने हिमाचल प्रदेश संघाचा ३४/२४ असा पराभव करीत तब्बल १५ वर्षांनंतर राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त केला. बुलढाणासारख्या शहरातून योगेश्वर याने दैदिप्यमान कामगिरी केली. याबद्दल योगेश्वरचे महावितरण तसेच सर्व स्तरातून कौतुक होत आहे. उत्कृष्ट कामगिरीचे योगेश्वर याने सर्व श्रेय बुलढाणा महावितरणचे अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके, कार्यकारी अभियंता चव्हाण, उपकार्यकारी अभियंता विवेक वाघ, तसेच सहाय्यक अभियंता सुहास देशपांडे आणि महावितरणच्या सर्व कर्मचारी तसेच मित्र परिवाराला दिले.


